S M L

निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील, आबांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला

Sachin Salve | Updated On: Sep 29, 2014 06:52 PM IST

R R patil29 सप्टेंबर : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर आबांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता होती मात्र निवडणूक आयोगाने आता आबांच्या उमेदवारीवर हिरवा कंदील दाखवला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने स्वीकारला आहे.

सांगली जिल्ह्यातल्या तासगाव-कवठे महांकाळमधून आर.आर.पाटील यांनी आपला अर्ज भरला आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात अपुरी माहिती आहे, अशी तक्रार भाजपचे उमेदवार अजित घोरपडे आणि अपक्ष बापुसो बोधले यांनी केली होती. त्यानंतर आर.आर.पाटील यांच्या अर्जाची छाननी झाली. अखेरीस निवडणूक आयोगाने आबांना दिलासा देत हिरवा कंदील दिला.आबांची उमेदवारी धोक्यात आली की काय म्हणून त्यांच्या समर्थकांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी समर्थकांनी एकच जल्लोष केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 29, 2014 06:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close