S M L

यंदा श्रीमंत उमेदवारांची भाऊगर्दी, मंगलप्रभात लोढा नंबर 1 ला !

Sachin Salve | Updated On: Sep 30, 2014 01:46 AM IST

यंदा श्रीमंत उमेदवारांची भाऊगर्दी, मंगलप्रभात लोढा नंबर 1 ला !

mangalprasd lodha29 सप्टेंबर : निवडणूक आणि पैसा हा नेहमी निवडणुकीच्या काळातला लक्षवेधी प्रश्न असतो. 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आहे.

उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना आपली संपत्ती जाहीर करावी लागते. आणि यंदाही निवडणुकीच्या आखाड्यात कोट्यधीश उमेदवार उतरले आहे. अनेक नेत्यांच्या संपत्तीत 2009 च्या तुलनेत दुप्पट नाही तर तिप्पट वाढ झाली आहे.

यंदाच्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मंगलप्रभात लोढा यांनी सर्वात श्रीमंत उमेदवार होण्याचा मान पटकावलाय. मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती 2009 साली 68 कोटी होती ती आता तब्बल 200 कोटी इतकी आहे.

तर मनसेला रामराम ठोकून भाजपमध्ये दाखल झालेले भाजपचे उमेदवार राम कदम यांच्याकडे 2009 साली 13.5 कोटी संपत्ती होती ती आता 39 कोटी इतकी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची 2009 साली 10.80 कोटी होती ती आता 37.93 कोटी इतकी आहे. तर काँग्रेसचे उमेदवार अमित पटेल यांची मालमत्ता 2009 साली 13.5 कोटी होती आता 37 कोटी झालीये. आणि काँग्रेसचे कोल्हापूरचे नेते सतेज पाटील यांची मालमत्ता 23 कोटी इतकी आहे.

हे आहेत टॉप 5 श्रीमंत उमेदवार

मंगलप्रभात लोढा - भाजप

2009 - 68 कोटी

2014 - 200 कोटी

- राम कदम - भाजप

2009 - 13.5 कोटी

2014 - 39 कोटी

अजित पवार - राष्ट्रवादी

2009 - 10.80 कोटी

2014 - 37.93 कोटी

अमिन पटेल - काँग्रेस

2009 -13.5 कोटी

2014- 37 कोटी

सतेज पाटील - काँग्रेस

2014- 23 कोटी

इतरही कोट्यधीश उमेदवार...

- सरदार तारासिंह - भाजप

2009 - 11 कोटी

2014 - 18 कोटी

- सचिन अहिर - राष्ट्रवादी

2009 - 7.9 कोटी

2014 - 17.5 कोटी

- वर्षा गायकवाड - काँग्रेस

2009 - 62 लाख

2014 - 3.1 कोटी

- कृपाशंकर सिंह - काँग्रेस

2009 - 80 लाख

2014 - 3.2 कोटी

- चंद्रकांत हंडोरे - काँग्रेस

2009 - 99 लाख

2014 - 1.5 कोटी

पुणे

- विनायक निम्हण - काँग्रेस - 21 कोटी 56 लाख - शिवाजीनगर

- हर्षवर्धन पाटील - काँग्रेस - 1 कोटी 70 लाख - इंदापूर

लातूर

- अमित विलासराव देशमुख - काँग्रेस 1.72 कोटी

कोल्हापूर

- प्रकाश आवाडे - काँग्रेस - 12 कोटी - इचलकरंजी

- मदन करंदे - राष्ट्रवादी - 1.5 कोटी - इचलकरंजी

- सुरेश हलवणकर - भाजप - 1 कोटी - इचलकरंजी

- अमल महाडिक - भाजप - 6 कोटी - कोल्हापूर दक्षिण

- राजेश क्षीरसागर - शिवसेना - 4 कोटी - कोल्हापूर उत्तर

- चंद्रदीप नरके - शिवसेना - 5 कोटी - करवीर

अहमदनगर

- राधाकृष्ण विखे पाटील - काँग्रेस - 9 कोटी 97 लाख - शिर्डी

- बाळासाहेब थोरात - काँग्रेस - 3 कोटी 50 लाख - संगमनेर

- वैभव पिचड - राष्ट्रवादी - 1 कोटी 67 लाख - अकोले

- बबन पाचपुते, भाजप- 11 कोटी, 37 लाख

जळगाव

- सुरेश जैन - शिवसेना - 7 कोटी - जळगाव

- सुरेश भोले - भाजप - 12 कोटी - जळगाव

- मनोज चौधरी - राष्ट्रवादी - 5 कोटी - जळगाव

- डॉ. राध्येश्याम चौधरी - काँग्रेस - 1 कोटी - जळगाव

धुळे

- कुणाल रोहिदास पाटील - 22 कोटी - काँग्रेस

बीड

- जयदत्त क्षीरसागर - 34 कोटी 40 लाख - राष्ट्रवादी

- पंकजा मुंडे पालवे- 78 कोटी 12 लाख - भाजप

- गंगाखेड - रत्नाकर गुट्टे -74 कोटी 76 लाख 27

नाशिक

- छगन भुजबळ, राष्ट्रवादी, 21 कोटी 91 लाख

- पंकज भुजबळ, राष्ट्रवादी - 20 कोटी 49 लाख

- अजय बोरास्ते, शिवसेना - 7 कोटी

- वसंत गीते- 3 कोटी 25 लाख

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 29, 2014 11:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close