S M L

मंगळयानाने पाठवले मंगळावरच्या धुळीकण वादळाचे फोटो

Samruddha Bhambure | Updated On: Sep 30, 2014 12:15 PM IST

मंगळयानाने पाठवले मंगळावरच्या धुळीकण वादळाचे फोटो

30 सप्टेंबर :  भारताच्या मंगळयानाने मंगळवर सुरू असलेल्या धुळीच्या वादळाचे फोटो पाठवल्याची असल्याची माहिती इस्राने सोमवारी दिली.

मंगळाच्या पृष्ठभागापासून सुमारे 74,500 किमी अंतरावरून हा फोटो कढण्यात आला आहे. मंगळाचा पृष्ठभाग, येथील खनिज संपत्ती आणि इथल्या मिथेन किंवा मार्शला गॅसच्या शक्यतेचा अभ्यास करणे हे मंगळयानाचे उद्दिष्ट आहे. मिथेन किंवा मार्शला गॅस हा जीवसृष्टीचे सूचक मानला जातो. यासाठी मंगळयानामध्ये मिथेन किंवा मार्श गॅसच्या अभ्यासासाठी सेन्सर्स, फोटो काढण्यासाठी कॅमेरा आणि इतर उपयोगी उपकरणे समाविष्ट करण्यासात आली आहेत. मंगळयान मंगळा ग्रहाभोवती किमान सहा महिने प्रदक्षिणा घालणार आहे.

गेल्या वर्षी 5 नोव्हेंबरला या यानाचं श्रीहरिकोटा इथून प्रयाण झालं होतं. यानंतर गेल्या आठवड्यामध्ये (24 सप्टेंबर) हे यान मंगळाच्या कक्षेमध्ये स्थिर झालं. पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगलाच्या कक्षेत यान स्थिर करणारा भारत जगामधील पहिलाच देश ठरला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2014 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close