S M L

रिपाइंमध्ये मतभेद चव्हाट्यावर, डांगळेंची हकालपट्टी आणि मनधरणीही !

Sachin Salve | Updated On: Sep 30, 2014 04:58 PM IST

dangle on athwale30 सप्टेंबर : रिपाइंचे नेते अर्जुन डांगळे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची आरपीआयमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. आरपीआयचे नेते अविनाश महातेकर यांनी ही माहिती दिलीये. मात्र दुसरीकडे खुद्ध रामदास आठवले यांनी तुर्तास डांगळेंवर कारवाई करणार नाही त्यांनी परत यावं असं आवाहन केलंय.

महायुती फुटल्यानंतर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र त्यांचा निर्णय चुकीचा आहे असं सांगत रिपाइंचे नेते अर्जुन डांगळे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. अर्जुन डांगळे यांच्या भूमिकेमुळे आठवले गटात फूट पडली. अखेरीस आज सकाळी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली अशी माहिती रिपाइंचे नेते अविनाश महातेकर यांनी दिली. मात्र दुसरीकडे रिपाइं गटात आता मतभेद चव्हाट्यावर आले आहे. डांगळे यांची एकीकडे हकालपट्टी करण्यात आली तर दुसरीकडे खुद्द रामदास आठवले यांनी त्यांच्यावर कारवाई करणार नाही असं स्पष्ट केलं. तसंच अर्जुन डांगळेंनी रिपाइंमध्ये परत यावं असं आवाहनही आठवलेंनी केलं. निवडणुकीनंतर शिवसेना, भाजप आणि रिपाइंला एकत्र यावं लागेल. शिवसेनेनं आमच्यासोबत यावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे असंही आठवले म्हणाले. तसंच भाजपकडून आम्हांला 3-4 जागा वाढवून मिळण्याची शक्यता आहे असंही आठवलेंनी सांगितलं. तर रामदास आठवलेंनी शिवसेनेसोबत यावं असं आवाहन अर्जुन डांगळे यांनी केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2014 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close