S M L

मुंबईला वादळी पावसाने झोडपले

Sachin Salve | Updated On: Sep 30, 2014 11:31 PM IST

मुंबईला वादळी पावसाने झोडपले

mumbai rain news30 सप्टेंबर : महाराष्ट्रसह मुंबईत आज संध्याकाळी वादळी आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. ऐन संध्याकाळी

मुंबईतल्या चाकरमान्यांना अचानक आलेल्या पावसामुळे त्रेधातिरपट उडाली. वादळी पावासामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झाला. मुंबईची लाईफलाईन स्लो ट्रॅकवर आली तर अनेक भागात झाडं कोसळल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.

उशिरा आलेल्या पावसानं मंगळवारी निरोप घेतला. यावर्षी देशात 88 टक्के पाऊस झाला. सरासरीपेक्षा तो 12 टक्के कमी झाल्याचं हवामान खात्यानं मंगळवारी जाहीर केलं. पण परतीच्या पावसानं आज मुंबईकरांची त्रेधा उडवली. संध्याकाळी जोरदार पावसाची अचानक हजेरी लावली.

त्यामुळे काही ठिकाणी रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला. करी रोडदरम्यान पेंटाग्राफला समस्या आल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. धीम्या गतीनं जाणार्‍या गाड्या फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्या. हार्बर लाईनवरची दोन्ही बाजूंची लोकल सेवा खोळंबली. पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडं कोसळली. त्यामुळे ऐन संध्याकाळी वाहतुकीचा खोळंबा झाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2014 09:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close