S M L

भाजपला पवारांना सोबत घ्यायचं असेल म्हणून युती तोडली -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2014 11:21 PM IST

भाजपला पवारांना सोबत घ्यायचं असेल म्हणून युती तोडली -उद्धव ठाकरे

30 सप्टेंबर : शरद पवारांना सोबत घ्यायचं होतं म्हणून युती तोडली असेल असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी केलाय. 'भविष्य महाराष्ट्राचं' या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी आयबीएन-लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यात शिवसेनेनं युती तोडलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच जर मुख्यमंत्रिपदासाठी कुणी आव्हान दिलं तर आपण मुख्यमंत्री होण्यास तयार आहे अशी घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली.

गेल्या 25 वर्षांचा भाजप आणि शिवसेनेचा संसार अखेर मोडला. जागावाटपावरून झालेल्या खेचाखेचीमुळे युती संपुष्टात आली. युती तुटल्यानंतर सर्वात प्रथम शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयबीएन लोकमतला विशेष मुलाखत दिली. आयबीएन-लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांच्याशी उद्धव ठाकरेंनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. भाजप आणि शिवसेनेत याअगोदरही अनेक वेळा वाद झाले पण पण कधी युती तुटली नाही. मुळात भाजपकडून चर्चेची सुरूवातच चुकीची झाली. अगोदर जागावाटपाच्या चर्चेसाठी मातोश्रीवर दोन्ही पक्षाचे महाराष्ट्रातील नेते एकत्र बसून चर्चा करून जागावाटप करत असतं. पण यंदा भाजपने दिल्लीतून माणूस पाठवला. भाजपने अगोदरपासून जागावाटपावर आपली बाजू ताणून धरली होती. भाजपला 34 जागा वाढवून हव्या होत्यात पण त्या जागा देणं अशक्य होतं. आम्हाच्या वाट्याच्या जागा आम्ही का वाढवून द्यायच्या. त्यात घटकपक्षांनी आम्ही आमच्या वाट्यातून जागा देण्याची तयारी दर्शवली होती पण तरीही भाजपने माघार घेतली नाही. ही युती भावनेच्या आधारावर आजवर टिकून राहिली होती पण भाजप नेत्यांमुळे ही युती तुटली असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला.

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी ही युती आणि महायुती उभारली त्यांची पिढी गेली जे युतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहिले त्यामुळे युतीत कधी वाद झाले नाही पण आज नेमकं जे स्वप्न आम्ही उराशी बाळगून होते ते स्वप्न काही पावलांवर दूर असतांना भाजपने साथ सोडली असंही उद्धव म्हणाले. सध्याच्या या घडामोडींमुळे जनता चिडलेली आहे. शिवसेनेशी झालेला विश्वासघात जनतेला आवडलेला नाही आमचे 18 खासदार दिल्लीत गेलेत ते महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत मांडतील. आम्ही केंद्रात सत्ता आल्यावरही पाहिजे ते मंत्रीपद द्या असं कधीच म्हटलं नव्हतं पण आज त्यांनी नातं तोडलं पण आम्ही आमचं काम करतच राहणार असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांना या अगोदरही एनडीएमध्ये यायचं होतं तसे प्रयत्नही झाले त्याबद्दल अगोदरही बातम्या आल्या आहेत. ज्या वेळेस पवार यांना एनडीएमध्ये घेण्याचा विषय झाला त्यावेळी आम्ही विरोध केला. आताही शरद पवारांना भाजपबरोबरच यायचं असेल म्हणून त्यांनी युती तोडली असेल असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा असावा ही महत्वाकांक्षा चुकीची आहे का ? असा सवालही त्यांनी केला आणि जर मुख्यमंत्री होण्याचं आव्हान दिल्यास मुख्यमंत्री होईन, अशी घोषणाही उद्धव यांनी केली. जागावाटपासाठी आदित्य ठाकरेंना चर्चेला पाठवलं यावर भाजपनं नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आदित्यना चर्चेसाठी पाठवण्यात काहीच चूक नव्हती, असं उद्धवनी सांगितलं.

ठळक मुद्दे

आघाडी सरकारने जनतेची प्रश्न सोडवली नाही -उद्धव ठाकरे

आमचे 18 खासदार दिल्लीत गेलेत ते महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत मांडतील -उद्धव ठाकरे

त्यांनी नातं तोडलं असेल पण आम्ही आमचं काम करतच राहणार -उद्धव ठाकरे

आघाडी सरकारने एकही प्रश्न सोडवला नाही -उद्धव ठाकरे

हीच देवाची इच्छा असेल की शिवसेनेचं एकट्याचं सरकार असेल

25 वर्ष युती भावनेच्या आधारावर राहिली -उद्धव ठाकरे

आधीही आमच्यात वाद झाले पण कधी युती तुटली नाही -उद्धव ठाकरे

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे गेले. त्यांची पिढी गेली जे युतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहिले -उद्धव ठाकरे

जागावाटपाच्या चर्चेला सुरूवातच चुकीची झाली -उद्धव ठाकरे

आधी महाराष्ट्रातील नेते चर्चेसाठी बसायचे पण यावेळी दिल्लीतून माणूस चर्चेसाठी पाठवण्यात आला -उद्धव ठाकरे

आमचेही 18 खासदार आलेत त्यामुळे आम्हीही कमजोर नाहीत -उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा असावा ही महत्वाकांक्षा चुकीची आहे का? -उद्धव ठाकरे

34 जागा वाढवून देण्याची मागणी अशक्य होती -उद्धव ठाकरे

मी केंद्रात सत्ता आल्यावरही पाहिजे ते मंत्रीपद द्या असं कधीच म्हटलं नव्हतं- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र आणि शिवसेनाप्रमुख हे नातं घट्ट आहे

सध्याच्या या घडामोडींमुळे जनता चिडलेली आहे.

शिवसेनेशी झालेला विश्वासघात जनतेला आवडलेला नाही- उद्धव ठाकरे

मला आवाहन दिलं तर मी नक्की मुख्यमंत्री होण्यास तयार -उद्धव ठाकरे

शरद पवारांना एनडीएमध्ये आणायचं होतं पण आम्ही त्यांना विरोध केला होता -उद्धव ठाकरे

शरद पवारांना भाजपबरोबरच यायचं असेल म्हणून त्यांनी युती तोडली असेल -उद्धव ठाकरे

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2014 11:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close