S M L

भारत-अमेरिका मैत्रीचे नवे पर्व सुरू !

Sachin Salve | Updated On: Oct 1, 2014 01:55 AM IST

भारत-अमेरिका मैत्रीचे नवे पर्व सुरू !

01 ऑक्टोबर : भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीसाठी आज आणखी एक पाऊल पुढे पडले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा झाली. यावेळी भारत आणि अमेरिकेतल्या संरक्षण कराराला आणखी 10 वर्षांची मुदतवाढ देण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं. या संबंधाने मोदींनी अमेरिकन शस्त्र उत्पादक कंपन्यांना भारतीय संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आमंत्रण दिलं. तसंच मोदींनी ओबामांना सहकुटुंब भारतभेटीचं निमंत्रणही दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौर्‍यातला मंगळवारी मुख्य टप्पा पार पडला. व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट झाली. व्हाईट हाऊसमध्ये दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. द्विपक्षीय चर्चेनंतर मोदी आणि ओबामा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत निवदेन दिलं. विशेष म्हणजे ओवल हाऊसमध्ये पहिल्यांदाच ही संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. आजपर्यंत ओवल हाऊसमध्ये मीडियाला निमंत्रित केलं जात नाही पण जगभरातील मीडिया यावेळी हजर होती. मोदींनी आपलं निवेदनाच्या सुरूवातीला अमेरिकेत झालेल्या आदरातिथ्याबद्दल ओबामांचे आभार मानले. ओबामा यांच्यासोबत आर्थिक विषयांवर चर्चा झाली. भारतात व्यवसायाच्या वृद्धीसाठी पोषक वातावरण तयार करण्यास भारताची तयारी आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान मैत्री होणं हे स्वाभाविक आहे. येणार्‍या काळात भारत आणखी विकसनशिल राष्ट्र म्हणून समोर येईल. आम्ही आण्विक उर्जेच्या क्षेत्रात असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी गंभीर आहोत असं मोदींनी स्पष्ट केलं. तसंच सुरक्षा सहकार्यासाठी आम्ही आणखी भर देण्याचा प्रयत्न करू. अमेरिकेच्या सुरक्षा कंपन्यांना यासाठी आम्ही भारतात गुंतवणूक आणि उद्योगा वृद्धीसाठी निमंत्रण देत आहोत. सोबतच अन्न सुरक्षेच्या बाबतील आम्ही आग्रही आहोत. याबाबत डब्लयुटीओनं व्यक्त केलेल्या शंकांबाबत आम्ही चर्चेस तयार आहोत असंही मोदी म्हणाले. दहशतवादासारख्या गंभीर विषयावर ओबामा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. बराक ओबामा यांनी आपल्या सहकुटुंबासह पुन्हा एकदा भारताला भेट द्यावी असं निमंत्रणही मोदींनी दिलं. तर मोदी यांच्यासोबत आंतराष्ट्रीय मुद्दे, सुरक्षा, व्यापार, मध्य पूर्वमध्ये घडलेली हिंसा आणि दहशतवादावर चर्चा झाली. त्यासोबतच व्यापार, सागरी सुरक्षा आणि इस्लाम धर्मीय देशात होत असलेल्या हिंसेबद्दल चर्चा झाली असं ओबामांनी सांगितलं.

 मार्टिन ल्युथर किंग स्मारकाला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टनमधल्या मार्टिन ल्युथर किंग स्मारकाला भेट दिली. शिष्टाचाराचे संकेत दूर सारत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत होते. त्यांनी पंतप्रधानांना स्मारक परिसर दाखवला. अमेरिकेच्या अध्यक्षांनी एखाद्या पंतप्रधानांसोबत स्मारक स्थळी जाणं हे महत्वांचं मानलं जातंय.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले ?

उर्जा, संरक्षण,पायाभूत सुविधा या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये करार

ओबामा आणि कुटूंबियांना भारत भेटीचं निमंत्रण -

नरेंद्र मोदींनी दिलं ओबामांना सहकुटुंब भारत भेटीचे निमंत्रण - मोदी

संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढले पाहिजे - मोदी

अन्न सुरक्षेच्या बाबतील आम्ही आग्रही आहोत याबाबत WTO नं व्यक्त केलेल्या शंकांबाबत आम्ही चर्चेस तयार -मोदी

सर्व्हीस क्षेत्रासाठी अधिक सवलती मिळाव्यात असा आग्रह ओबामांना केलाय - मोदी

अमेरिक झालेल्या आदरातिथ्याबद्दल आभार -मोदी

ओबामांशी सर्वच विषयांवर सविस्तर चर्चा झाली -मोदी

भारत वेगानं प्रगती करतोय -मोदी

आम्ही सुधारणांबाबत आग्रही आहोत - मोदी

भारत आणि अमेरिकेदरम्यान मैत्री होणं स्वाभाविक आहे -मोदी

आण्विक उर्जेच्या क्षेत्रात असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही गंभीर आहोत -मोदी

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2014 12:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close