S M L

स्त्री-भ्रूण हत्येत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर

सामाजिक सुधारणांचा आदर्श घालून देणारा छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा कोल्हापूर आता आणखी एका कारणाने गाजतोय... ते म्हणजे जन्माला येण्याआधीच मुलीचा गर्भ नाकारला जाणं. राज्यात सर्वाधिक स्त्री-भ्रूण हत्या कोल्हापुरातल्या 5 तालुक्यात होत असल्याचं एका पाहणीत आढळलंय.1991 च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 0 ते 6 वयोगटात एक हजार पुरुषामागे 931 मुली होत्या. पण दहा वर्षांनंतर हा समतोल बिघडला. 2001 च्या जनगणनेनुसार हे प्रमाण एक हजार पुरुषामागे 859 इतकं खाली आलं. शिरोळ तालुक्यात 0 ते 6 वयोगटात 1991मध्ये दरहजारी पुरुषामागे 914 इतक्या मुली होत्या. आता ही संख्या 827 वर येऊन पोहचलीय. हातकणंगले तालुक्यात हेच प्रमाण 925 वरून 829 वर आलंय. पन्हाळा तालुक्यात हे प्रमाण 931 वरून 816 वर आलंय. करवीर तालुक्यामधील हे प्रमाण 925 वरून 803 तर कागलमध्ये हे प्रमाण 925 वरुन 816 पर्यंत खाली घसरलंय. आणि या परिस्थितीला कारणीभूत ठरतायत ती गावोगावची आणि शहरातली सोनोग्राफी मशीन्स.कोल्हापूरमध्ये ज्या ठिकाणी गर्भलिंग निदान केलं जातं, त्या सेंटरवर दोन देवदेवतांचे फोटोही पहायला मिळतात. एक म्हणजे शंकराचा आणि दुसरा लक्ष्मीचा. यामध्ये शंकराचा फोटो असेल तर मुलगा आणि लक्ष्मीचा फोटो असेल तर मुलगी. याचा सांकेतिक भाषेत वापर करुन संबधीत डॉक्टर त्या दापत्याला मुलगा आहे कि मुलगी हे सांगतात. सोनोग्राफी मशीनचा असा दुरुपयोग करणार्‍या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे. मात्र या समस्येबाबत सरकार उदासीन आहे. हीच परिस्थिती कायम राहीली तर दरडोई उत्पन्नात आघाडीवर असणारा कोल्हापूर स्री-भ्रूण हत्येत राज्यातही नंबरवन ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2009 01:40 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2009 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close