S M L

आता होऊन जाऊ द्याच !

Sachin Salve | Updated On: Oct 1, 2014 07:44 PM IST

आता होऊन जाऊ द्याच !

final fight01 ऑक्टोबर : होऊन जाऊ द्या एकदाचं असं म्हणत विधानसभा निवडणुकीसाठी यंदा सर्वच पक्षांनी बाह्यावर सरसावून स्वबळावर मैदानात उतरले आहेत. आज (बुधवारी) अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. आमदारकीचं स्वप्न उराशी बाळगूण विधानसभेच्या रिंगणात उतरलेले काही उमेदवारी माघारी फिरले आहे तर कुठे बंडोबांनी दंड थोपटले. राज्यातील आता सर्वच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. अनेक ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. प्रमुख लढतीपैकी दक्षिण कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात विलासकाका उंडाळकर असा सामना रंगणार हे स्पष्ट झालं.

अवघ्या 15 दिवसांत राज्याला नवं सरकार मिळणार आहे. सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापलाय. जागावाटपाच्या तिढ्यावरून युती आणि आघाडी संपुष्टात आली. ऐन अर्ज भरण्याच्या आदल्यादिवशी युती आणि आघाडीचा संसार मोडला. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मिळालेला अपुर्‍या वेळामुळे अगोदरच काही उमेदवारांनी रिकाम्या हाती घरी परतावे लागले. आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. त्यामुळे सर्व लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील प्रमुख लढतीपैकी दक्षिण कराडच्या लढतीत मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र यादव यांनी अर्ज मागे घेतलाय. अर्ज मागे घेत यादव यांनी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा दिलाय. तर काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे चव्हाणांच्या विरोधात बंड करून अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले विलासकाका उंडाळकर यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उंडाळकरांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध विलासकाका उंडाळकर असा सामना रंगणार आहे. तर कोल्हापूरमध्ये दक्षिणमधून राष्ट्रवादीचे उमेदवार दुर्वास कदम यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे इथं तिरंगी लढत रंगणार आहे. काँग्रेसकडून सतेज पाटील, भाजपचे उमेदवार अमल महाडिक, शिवसेनेचे उमेदवार विजय देवणे यांच्या लढत होणार आहे. तर इस्लामपूर मतदारसंघातून शिवसेनेने माघार घेतली आहे. शिवसेनेनं अपक्ष उमेदवार अभिजीत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही अभिजीत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याविरोधात विरोधक एकजूट झाले आहे. त्यामुळे इस्लापूरमध्ये राष्ट्रवादीची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. तर मुंबईत वर्सोवामध्ये निवडणुकीच्या रिंगणातून शिवसेना बाहेर पडली आहे. वर्सोव्यातून उभे राहिलेले शिवसेनेचे उमेदवार राजूल पटेल यांची याचिका अखेर कोर्टाने फेटाळली. राजूल पटेल यांचा अर्ज निवडणूक आयोगाने अवैध ठरवला होता. त्याविरोधात पटेल यांनी कोर्टात धाव घेतली होती.

वेगवेगळ्या मतदारसंघातलं चित्र कसं असेल?

- कोल्हापूर दक्षिणमधून राष्ट्रवादीचे उमेदवार दुर्वास कदम यांची माघार

- कोल्हापूर दक्षिणमध्ये रंगणार तिरंगी लढत

- काँग्रेसकडून सतेज पाटील निवडणूक रिंगणात

- भाजपकडून अमल महाडिक उमेदवार

- शिवसेनेकडून विजय देवणे निवडणूक रिंगणात

- इस्लामपूर मतदार संघातून शिवसेनेची माघार

- शिवसेनेचा अपक्ष उमेदवार अभिजीत पाटील यांना पाठिंबा

- भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही अपक्ष उमेदवार अभिजीत पाटील यांना पाठिंबा

- राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांविरोधात विरोधकांची एकजूट

- कल्याण ग्रामीणमधून भाजपचे उमेदवार रमेश म्हात्रे यांची माघार

- म्हात्रे यापूर्वी होते शिवसेनेत

- शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांना होणार फायदा    

- वर्सोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून शिवसेना बाहेर

- वर्सोव्याच्या शिवसेनेच्या उमेदवार राजूल पटेल यांची याचिका कोर्टाने फेटाळली

- तांत्रिक कारणामुळे निवडणूक आयोगाने फेटाळला होता अर्ज

- याविरोधात राजूल पटेल यांनी केली होती याचिका

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2014 07:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close