S M L

...तर शिवसेनेची मदत घेऊ -विनोद तावडे

Sachin Salve | Updated On: Oct 2, 2014 01:26 AM IST

...तर शिवसेनेची मदत घेऊ -विनोद तावडे

01 ऑक्टोबर : शिवसेना- भाजपची युती तुटली याचे दुखः होत आहे. गरज भासल्यास या निवडणुकीनंतर शिवसेनेची मदत घेऊ असे सूचक वक्तव्य करत भविष्यात सत्ता स्थापनेच्या वेळी शिवसेना भाजप एकत्र येऊ शकते असे संकेत भाजपचे नेते विनोद तावडे यांनी दिले आहे. तावडे आज भाजपच्या प्रचारासाठी उस्मानाबाद कनगरा गावी आले असता विनोद तावडे यांनी हे वक्तव्य केले आहे.

शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे तर आघाडीत ही बिघाडी झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक मतांचे ध्रुवीकरण करणारी आहे. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपला संपूर्ण बहुमत मिळेन त्यामुळे दुसर्‍या कोणत्याही पक्षाची मदत घेण्याची वेळ येणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा तर प्रश्न उद्भवत नाही असं विनोद तावडेंनी स्पष्ट केलं. तसंच हेही खरं आहे की निवडणुकीनंतर गरज पडल्यास आमचा मित्र पक्ष शिवसेना आमदारांची मदत घेऊ असं तावडे यांनी सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात युती बाबत नवीन वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. विशेष म्हणजे एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपवर एकदाही टीका करण्याची संधी सोडत नाही. मात्र भाजपच्या नेत्यांनी यावर मौन बाळगलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2014 09:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close