S M L

दिल्लीश्वरांसमोर वाकणार नाही -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Oct 1, 2014 11:20 PM IST

udhav on ncp01 ऑक्टोबर : शिव छत्रपतींचा आशीर्वाद मागताय पण शिव छत्रपती कधी दिल्लीसमोर वाकले नाही तर मी का वाकू?, शिव छत्रपतींचा आशीर्वाद तुम्हाला पाहिजे ना तर शिव छत्रपतींनीच स्वाभिमान शिकवलाय तिच शिकवण घेऊन मी पुढे आलो त्यामुळे मागे हटलो नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलेच फटकारले. लोकसभा निवडणुकीत आमचा वापर करून घेतला, गरज संपल्यावर आम्हाला टाकून दिलंत असा आरोपही त्यांनी केला. तसंच शेतकर्‍यांचं कर्ज माफ करावं असं जाहीर आवाहनही उद्धव यांनी मोदींना केलं. उद्धव ठाकरेंची परभणीत सभा पार पडली यावेळी ते बोलत होते.

युती तुटल्यानंतर आता शिवसेनेनं आपल्या स्टाईलने भाजपचा समाचार घेण्यास सुरूवात केली. सामना असो अथवा पत्रकार परिषदेत किंवा जाहीर सभा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. आज परभणीत शिवसेनेची भव्य सभा पार पडली. यावेळी उद्धव यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले. सगळ्यांना वाटतं शिवसेना आज एकटी पडलीय पण थांबा, ही शिवसेना वाघांची आहे. आई भवानींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. मी लढणार आणि मी जिंकणार असा नारा उद्धव यांनी दिला. जर मोदींची लाट असेल तर भाजपला सभा घेण्याची गरज काय आहे असा सवालही त्यांनी पुन्हा उपस्थित केला. तसंच भाजपनं युती तोडली असली तरी लोकसभेत आम्ही सोबत लढलो. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेतल्यात. यावेळी त्यांनी लोकांना खूप सारी आश्वासनं दिली. लोकांनीही मोदींना भरभरुन मतं दिली. आता नरेंद्र मोदींना जाहीर विनंती आहे की गोरगरीब शेतकर्‍यांचं कर्जमाफी करून तुम्ही शब्द पाळावा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी मोदींना केलं. गेली 25 वर्ष ही युती टिकली कारण युती जागावाटपावर नव्हती तर हिंदुत्वावर टिकून होती. पण यावेळी जागावाटपाबद्दल दिल्लीतून माणूस आला. 135 जागा द्या, नाही 140 जागा द्या, कशाच्या आधारावर या जागा मागितल्यात. आमचं दिल्लीने हे ठरवलं, ते ठरवलं असं सांगितलं गेलं पण दिल्ली तुमच्यासाठी आहे आमच्यासाठी नाही. तुम्ही शिव छत्रपतींचा आशीर्वाद मागताय पण शिव छत्रपती कधी दिल्लीसमोर वाकले नाही तर मी का वाकू ? शिव छत्रपतींचा आशीर्वाद तुम्हाला पाहिजे ना तर शिव छत्रपतींनीच स्वाभिमान शिकवलाय तिच शिकवण घेऊन मी पुढे आलो त्यामुळे मागे हटलो नाही असा ठाकरी प्रहारही उद्धव यांनी भाजपवर केला तसंच आज शिवछत्रपतींचे आशीर्वाद मागता, कधी शिवजयंती साजरी केली का ? असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2014 11:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close