S M L

आम्हालाही युती हवी होती पण... -गडकरी

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2014 11:21 PM IST

आम्हालाही युती हवी होती पण... -गडकरी

02 ऑक्टोबर : शिवसेना आणि भाजपची युती व्हावी अशी आमची इच्छा होती पण शिवसेना 151 जागांवर ठाम राहिली. त्यामुळे दुर्भाग्याने युती तुटली असं स्पष्टीकरण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं. शिवसेनेला विरोधी पक्ष मानत नाही आणि कटुता वाढवायची नाही जर भविष्यात पुन्हा एकत्र येण्याची संधी आली तर पुन्हा युती होऊ शकते असे संकेतही गडकरींनी दिले. 'भविष्य महाराष्ट्राचं' या कार्यक्रमात नितीन गडकरींनी आयबीएन-लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांच्याशी दिलखुलास बातचीत केली. यावेळी त्यांनी भाजपचं सरकार आल्यास गेल्या तीन महिन्यांतले निर्णय रद्द करणार, अशी घोषणा केलीय.

गेल्या 25 वर्षांचा शिवसेना आणि भाजपचा संसार जागावाटपाच्या तिढ्यावरून मोडला. शिवसेनेनं जागावाटपासाठी भाजपलाच जबाबदार धरलं. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयबीएन लोकमतला विशेष मुलाखत दिली. आमच्या 'भविष्य महाराष्ट्राचं' या कार्यक्रमात नितीन गडकरींनी युती का तुटली याची कारणीमिमांसा केली. मी या सगळ्या वादातून बाजूला होतो. ज्या वेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा मी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडे गेलो होतो तेव्हा भाजप-सेना युतीला पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. युती करण्यासाठी गेलो नव्हतो पण माझ्या या भेटीबद्दल वेगळा अर्थ काढला गेला. सेनेनं 'सामना'तून माझ्यावर टीका केली. त्यामुळे मी दुखावला गेलो. राष्ट्रीय अध्यक्षांना सांगून जागावाटपाच्या वादात मी पडलो नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हा सर्वांमध्ये नितांत आदर आहे. युती टिकावी अशी आमची इच्छा होती पण दुर्भाग्य असं की शिवसेनेनं 151 जागा पक्का करून टाकल्यात आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही जाहीर करून टाकला. पण तरीही ज्याचे जास्त उमेदवार त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युलाही मांडला.

पण सेनेने अगोदर निर्णय पक्का केल्यामुळे युती तुटली. ते म्हणाले 18 जागा दिल्यात आणि आमच्याही काही जागा कमी होत होत्या. पण तरीही आम्ही विनंती केली. 59 जागा अशा आहेत जिथे शिवसेना जिंकली नाही आणि त्या जागा आम्हाला द्या अशी मागणी ही केली शेवटी असं वाटलं की 135 जागांवर हा वाद मिटेल पण असं झाली नाही अखेरीस युती तुटली.तसंच त्यांनी अनंत गीतेंनी राजीनामा देण्याची घाई करू नये, असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णयच घेतले नाहीत. पण शेवटच्या पंधरा दिवसांत इतक्या सह्या कशा केल्या, असा सवाल उपस्थिती केला. भाजपचं सरकार आल्यास गेल्या तीन महिन्यांतले निर्णय रद्द करणार, अशी घोषणा गडकरींनी केलीय.

काही ठळक मुद्दे

कटुता वाढवायची नाही - गडकरी

आम्हाला युती हवी होती - गडकरी

आम्ही लोकसभेच्या जााग सोडत गेलो पण आमच्या विधानसभेच्या जागा वाढल्या नाहीत- गडकरी

शिवसेनेला विरोधी पक्ष मानत नाही- गडकरी

मी मैत्री निभावणारा - गडकरी

नारायण राणे आणि राज ठाकरेंनी शिवसेना सोडू नये म्हणून प्रयत्न केले-गडकरी

शेतीच्या प्रश्नावर पवारांशी अनेकदा चर्चा झाली - गडकरी

राज ठाकरेंनी सेना सोडून जाऊ नये यासाठी प्रयत्न केले - गडकरी

भाजपला 150 पेक्षा अधिक जागा मिळतील - गडकरी

मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत - गडकरी

काँग्रेस राष्ट्रवादीशी घेणंदेणं नाही - गडकरी

मुख्यमंत्र्यांकडून एकही पत्र नाही - गडकरी

पंधरा दिवसात इतक्या सह्या कशा झाल्या -गडकरी

भाजपचे सरकार आलं तर तीन महिन्यांतले निर्णय रद्द करणार - गडकरी

निर्णय न घेणं हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय - गडकरी

साठ टोल रद्द केले - गडकरी

आघाडी सरकारनं टोलचा अतिरेक केला - गडकरी

राज्याची घडी दोन महिन्यात बसेल - गडकरी

सिंचनाचा पैसा गेला कुठे ? - नितीन गडकरी

आज कर्ज फेडण्यासाठीही सरकारकडे पैसा नाही -नितीन गडकरी

धोरणात्मक निर्णय घेण्यात सरकार अपयशी - गडकरी

नको तिथे राज्य सरकारने टोल उभारले -गडकरी

मनाचा मोठेपणा दाखवत आमची नेहमीच सहकार्याची भावना - गडकरी

प्रत्येक पक्षाला वाढण्याची इच्छा, त्यात गैर नाही - गडकरी

आमच्याकडे चेहर्यांची कमतरता नाही - गडकरी

मी आनंदासाठी राजकारण करतो -गडकरी

अविरल निर्मल गंगेसाठी प्रयत्न - गडकरी

विकास आणि पर्यावरण समन्वय साधायचाय- गडकरी

सागरी वाहतुकीच्या अनेक प्रकल्पांवर काम सुरू -गडकरी

फल आणि अन्नधान्यासाठी कूलिंग सिस्टिम आणि स्टोअरेजच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न - गडकरी

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपची संसदीय समिती घेईन -गडकरी

मी दिल्लीत खूश, मुख्यमंत्रीपद नको -गडकरी

राज्याच्या हिताचं काम जो करेल त्यांच्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम करेन

- राज्याच्या विकासाशी बांधील- गडकरी

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2014 12:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close