S M L

काँग्रेसच्या जाहिरातींसाठी पैसे कोणी दिले? -अजित पवार

Samruddha Bhambure | Updated On: Oct 2, 2014 01:50 PM IST

काँग्रेसच्या जाहिरातींसाठी पैसे कोणी दिले? -अजित पवार

02 ऑक्टोबर :  पृथ्वीराज चव्हाण मिस्टर क्लीन असतील तर काँग्रेसच्या जाहिरातींना कोणी पैसे पुरवले? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे. सध्या काँग्रेसची एक जाहिरात टीव्हीवर गाजते आहे. त्याचा संदर्भ घेऊन चव्हाणांची सही फक्त जाहिरातीतच दिसली, यापूर्वी दिसतच नव्हती, असा टोमणा अजित पवारांनी लगावला आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी काही बिल्डर्सना फायदा करून दिल्याचा गंभीर आरोपही अजित पवारांनी केला आहे. नागपूरमधल्या एका सभेत त्यांनी ही टीका केली आहे.

दरम्यान, निवडणुकीनंतर राष्ट्रवादी भाजपबरोबर जाणार नाही, याचा शरद पवारांनी पुनरुच्चार केला आहे. आज औरंगाबादमध्ये त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. तसंच त्यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या कामाचं कौतुकही केलं.

पृथ्वीराज चव्हाणांविरोधातली लढाई राष्ट्रवादीनं त्यांच्या मतदारसंघापर्यंत नेली आहे. काल वेगवान घडामोडी घडत दक्षिण कराडमध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र यादव यांनी अर्ज मागे घेऊन पृथ्वीराज चव्हाणांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार विलासकाका उंडाळकरांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. विलासकाका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात दक्षिण कराडमध्यून निवडणूक लढवणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2014 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close