S M L

निवडणुकीनंतर राष्ट्रवादीशी युती अशक्य -जावडेकर

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2014 11:21 PM IST

निवडणुकीनंतर राष्ट्रवादीशी युती अशक्य -जावडेकर

prakash javadekar02 ऑक्टोबर : आम्ही युती टिकवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण युती मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीवरून तुटली. त्यानंतही आमचं राष्ट्रवादीशी संधान आहे असा अत्यंत विचित्र आरोप केला असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलंय. आयबीएन लोकमतच्या 'भविष्य महाराष्ट्राचं' या कार्यक्रमात प्रकाश जावडेकर यांनी आयबीएन-लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांच्याशी दिलखुलास बातचीत केली. यावेळी त्यांनी निवडणुकीनंतरही राष्ट्रवादीशी युती शक्य नाही असंही स्पष्ट केलंय.

'भविष्य महाराष्ट्राचं' या आमच्या कार्यक्रमात प्रकाश जावडेकर यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत जावडेकर म्हणतात, आजपर्यंत महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुणीही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कधी जाहीर केला नाही. काँग्रेसने कधी उमेदवार जाहीर केला नाही आणि राष्ट्रवादीने कधी जाहीर केला नाही. पण शिवसेनेनं अगोदरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करून टाकला होता. आता मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणं किंवा न करणं हा रणनीतीचा भाग असतो असा टोला जावडेकर यांनी शिवसेनेला लगावला. काही राज्यांमध्ये आम्ही नेता जाहीर करतो. कारण प्रत्येक राज्याची राजकीय प्रकृती असते. जनता ही पक्षाच्या ध्येय धोरणं पाहून मत देतात चेहरा पाहून मतं देत नाही. मोदींनी जसं चांगलं सरकार चालवलंय तसं चांगलं सरकार भाजप चालवणार आहे असं आवाहन आम्ही करतो. आमच्यामध्ये काही घराणेशाही नाही, जातीपातीचं राजकारण नाही आमच्या पक्षात अनेक मातब्बर आणि कार्यक्षम उमेदवार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उमेदवार पाहून नाही तर काम पाहून, धोरणं पाहून मत देतात असंही ते म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2014 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close