S M L

धुळ्यात कारमधून 11 लाखांची रोकड, एक पिस्तूल जप्त

Sachin Salve | Updated On: Oct 2, 2014 04:47 PM IST

धुळ्यात कारमधून 11 लाखांची रोकड, एक पिस्तूल जप्त

02 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांनी पाठलाग करत एका वाहनातून सुमारे 11 लाख रुपयांची रोकड, एक पिस्तूल आणि 20 जिवंत काडतुसे जप्त केली. महापलिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या ई-टेंडर प्रक्रियेसाठी धुळ्यात आलेल्या ठेकेदारासह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धुळे महापलिकेत कोट्यवधी रुपयांचा अनधिकृत व्यवहार होणार असून संशयास्पद वाहन महापालिकेच्या आवारात उभी असलायची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस महापालिकेत येऊन धडकले. मात्र पोलीस येण्याआधीच पालिकेतून संशयित वाहन पसार झाली होती. दरम्यान वाहनाचा पाठलाग करत पोलिसांनी एका वाहनातून 11 लाख रुपये रोकड, एक पिस्तूल व 20 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. निवडणूक काळात 50 हजारपेक्षा जास्त रक्कम व कोणतेही शस्त्र जवळ बाळगता येत नाही. ताब्यात घेण्यात आलेल्या ठेकेदाराकडे 11 लाख रुपयांची रोकड, एक पिस्तूल व 20 जिवंत काडतुसे सापडली आहेत. त्यामुळे संशय निर्माण झाला आहे. महापालिकेत 136 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या टेंडरची छाननी सुरू असतांना ठेकेदार घुले तेथे आल्याचे सांगितलं जातंय. ठेकेदार घुले याने देखील निविदा भरली आहे. राजू घुले हे पाणीपुरवठाचे एमजीपीचे मुंबई येथील ठेकेदार आहेत. पोलीसान मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदार राजू अप्पाजी घुले, ठाणे जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता सुबोध भारत व वाहनाचा चालक विठ्ठल बोथर या तिघा संशयतांना ताब्यात घेतले असून आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2014 04:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close