S M L

पवारांची तिसरी पिढी राजकारणात, जय पवार प्रचारात !

Sachin Salve | Updated On: Oct 2, 2014 09:53 PM IST

पवारांची तिसरी पिढी राजकारणात, जय पवार प्रचारात !

02 ऑक्टोबर : पवार घराण्याची तिसरी पिढीही आता राजकारणात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा जय पवारांनी बारामतीतून अजित पवारांच्या प्रचाराला सुरूवात केलीय.आपले वडील राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा जय यांनी बोलून दाखवली.  बुधवारी बारामतीत अजित पवार यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेत जय पवार सहभागी झाले होते.

जसजसा काळ जातोय तसतसं विविध पक्षांचे नेते आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात आणताना दिसत आहेत. यात आता बारामतीचं पवार घराणंही मागे राहिलेलं नाही. लोकसभा निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. आता विधानसभेच्या निमित्ताने अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार यांनी राजकारणात प्रवेश केलाय. आपली राजकारणात यायची इच्छा असली तरी त्याचा निर्णय साहेब आणि दादाच घेतील मात्र जर राजकारणात आलोच तर आपणही अजितदादांसारखे काम करू असंही जय पवार यांनी सांगितलंय. जय पवार यांच्या पहिल्याच पदयात्रेत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत जय पवारांचं जंगी स्वागत केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2014 08:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close