S M L

काँग्रेसमधूनच चव्हाणांना विरोध होता -तटकरे

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2014 09:38 PM IST

काँग्रेसमधूनच चव्हाणांना विरोध होता -तटकरे

tatkare on cm03 सप्टेंबर : पृथ्वीराज चव्हाणांना अस्थिर करण्याचे प्रयत्न काँग्रेसमधूनच झाले, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.

आमच्याआधी भ्रष्टाचाराचे आरोप काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनीच पृथ्वीराज चव्हाणांवर केले, त्याआधी दिल्लीत मुख्यमंत्री बदलाचा तीन आठवडे खल घातला गेला.

हे सर्वकाही काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांवर अविश्‍वास दाखवण्यासारखं होतं, तसंच आघाडी व्हावी असं पृथ्वीराज चव्हाणांच्या मनातच नव्हतं, असा घणाघाती आरोपही सुनील तटकरे यांनी IBN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलाय.

ऐन निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री बदलासाठी वेळ वाया घालवला. त्यांचं काम कसं होतं यावर बैठका घेतल्यात हे कुणी मांडलं तर काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली. ही भूमिका राष्ट्रवादीने मांडली नव्हती असंही तटकरे म्हणाले. तसंच 144 जागांची मागणी केली त्यात काय चुकलं. लोकसभेत राष्ट्रवादीच्या 4 जागा आल्यात तर काँग्रेसच्या 2 जागा आल्यात. मागील निवडणुकीतही आम्ही कमी जागा घेतल्या होत्या. ज्या जागेवर ते जिंकू शकत नाही त्या जागा आम्ही मागितल्या होत्या. पण तरी चर्चा करता आली असती. पण समन्यवाचा अभाव होता. याची जबाबदारी चव्हाणांची होती पण चव्हाणांच्या मनात जर काही वेगळं असेल तर त्याला आम्ही करू शकलो नाही असंही तटकरे म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2014 09:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close