S M L

सत्ता आल्यास तुमची सुद्धा फाईल बाहेर काढू -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2014 11:50 PM IST

Image udhav_thakre_on_ajit_pawar_and_cm_300x255.jpg03 ऑक्टोबर : जेव्हा फाईलींवर सह्या करायची वेळ होती तेव्हा केल्या नाहीत आणि आता जाहिरातीतून दाखवतायत. शिवसेनेचं सरकार आल्यावर ज्या लोकांवर तुम्हा कृपा केली असले त्यांच्या भानगडी आम्ही नक्की बाहेर काढू असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय. शिवसेनेची भव्य प्रचारसभा बोरिवलीत पार पडली. यावेळी ते बोलत होते.

 

उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. आज जाहिरातीत चव्हाण सह्या करतांना दिसत आहे पण जेव्हा सह्या करायच्या होत्या तेव्हा हाताला लकवा भरला होता.

पण हे लक्षात ठेवा शिवसेनेचं सरकार आल्यावर ज्यांना तुम्ही पाठिशी घातलं, ज्यांच्यावर कृपा केली त्यांच्या भानगडी बाहेर काढू असा इशारा उद्धव यांनी दिला. तसंच पृथ्वीराज चव्हाणांनी भ्रष्टाचार्‍यांवर पांघरूण घातलं, असा आरोपही उद्धवंनी केला. पृथ्वीराज चव्हाण निर्णय घ्यायला उशीर लावायचे, असंही ते म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2014 11:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close