S M L

...मग मोदी काय मुख्यमंत्री होणार का? -ठाकरे

Sachin Salve | Updated On: Oct 4, 2014 06:35 PM IST

...मग मोदी काय मुख्यमंत्री होणार का? -ठाकरे

udhav akola04 ऑक्टोबर : भाजपकडे प्रचारासाठी चेहराच नाही त्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवावे लागले आहे. जर उद्या सत्ता आली तर नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होणार आहे का? पंतप्रधान हे देशाचे आहे भाजपचे नाही असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. अकोल्यात ठाकरेंची सभा पार पडली यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. त्यांची आज (शनिवारी) अकोल्यामध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. शिवसेना आणि भाजपसोबतचं नातं हे 25 वर्षांचं होतं. आज हे नातं तुटलं याचं दु:ख आहे. पण ही युती त्यांच्यामुळेच तुटली. हे महाराष्ट्र आहे काही धृतराष्ट्र नाही. लोकसभा निवडणुकीत आम्ही नरेंद्र मोदींसाठी मतं मागितली पण आज मोदी सेनेसाठी मतं मागत नाहीयेत हे दुदैर्व आहे. भाजपकडे चेहरा नसल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना इथं येऊन सभा घ्याव्या लागतात पण त्यांनी हे लक्षात घ्यावे की, पंतप्रधान हे देशाचे आहे. भाजपचे नाही असा टोलाही उद्धव यांनी लगावला. तसंच नरेंद्र मोदी आज राज्यात सभा घेणार आहेत. पण त्यांनी लोकसभेत दिलेली आश्वासनं पूर्ण करावी. तुम्ही भाजपसाठी मत मागता आम्ही मदत मागतोय. नुसती भाजपसाठी मदत मागू नका शेतकर्‍यांना कर्जमुक्त करा अन्यथा फैसला जनता करेल असं आवाहनही उद्धव यांनी केलं. विदर्भाशी रक्ताचं नातं असून महाराष्ट्रापासून वेगळा होऊ देणार नाही असंही उद्धव यांनी ठणकावून सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2014 06:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close