S M L

केंद्र नीट सांभाळा, राज्य सांभाळण्यास आम्ही खंबीर -राज

Sachin Salve | Updated On: Oct 5, 2014 02:18 AM IST

maharashtra-navnirman-sena-mns-chief-raj-thackeray504 ऑक्टोबर : भाजपने केंद्र सांभाळावं राज्य सांभाळायला मनसे खंबीर आहे असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावलाय. भाजपच्या कोणत्याही नेत्याचा चेहरा होर्डिंगवर दिसत नाही, यांचे चेहरे बघून एकही मत मिळणार नाही का? असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. लातूरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते.

मराठवाडा, विदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा झंझावात सुरू आहे. लातूरमध्ये निलंगा इथं मनसेची प्रचार सभा पार पडली. नेहमी मोदींचं गुणगाणं गाणारे राज ठाकरे यावेळी त्यांनी मोदींवर निशाणा साधला. कशाला पाहिजे काँग्रेस आणि कशाला पाहिजे भारतीय जनता पार्टी. तुम्हाला केंद्र दिला आहे तो नीट सांभाळा महाराष्ट्र सांभाळण्यासाठी आम्ही खंबीर आहोत अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. तसंच नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभा घेणार आहे. 20 सभा किंवा 40 सभा घ्या पण शेवटी काय तर मोदीच. ही लोकं यांची फोटो सुद्धा जाहिरातीत टाकत नाही. यांचे चेहरे पाहून यांना मतंही मिळणार नाही असा टोलाही राज यांनी लगावला. मात्र भाजपवर टीका केल्यानंतर त्यांनी आग्रहाचा सूर लगावला. केंद्रात काँग्रेसची सत्ता होती तेव्हा भाजपची सत्ता असलेल्या राज्यांना त्यांनी प्रोत्साहन आणि पाठिंबा दिलाच होता, अगदी तसाच पाठिंबा भाजपने मनसेला द्यावा असंही राज ठाकरे म्हणालेत. मराठवाड्यातल्या माजी मुख्यमंत्र्यांवरही राजनी सडकून टीका केली. मराठवाड्याने चार मुख्यमंत्री दिले. त्यातले तीन भ्रष्टाचाराच्या आरोपात घरी गेले. शिवाजीराव निलंगेकर तर मुलीचे मार्क वाढविताना सापडले. या लोकांनी घराणेशाही चालविली आहे. कोणत्याही पक्षात यांचेच नातेवाईक असतात अशी टीका राज यांनी केली. यावेळी राज ठाकरेंनी लोकांनाही चांगलेच फैलावर घेतले. टाळ्या-शिट्यानी काही होणार नाही. हसण्यावर घेण्यापेक्षा गंभीर व्हा !, असा सल्ला देत राज ठाकरे म्हणाले की, मी मुळचा व्यंगचित्रकार आहे, मी आजही माझं करिअर घडवू शकतो, हौस म्हणून राजकारण करत नाही. तुम्ही हसण्यावर घेता म्हणून अजित पवार सारखा माणूस धरणग्रस्तांची खिल्ली उठवतो. मेलेल्या मनासोबत मला राजकारण करायचे नाही. मन जिवंत ठेवा आणि उमेदवारांना जाब विचारा असं सांगत राज ठाकरेंनी मनसे सत्तेत आल्यास 12 लाख नोकर्‍यांची निर्मिती करणार असल्याचेही आश्वासन दिले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2014 09:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close