S M L

सभांचा धडाका, कोण काय म्हटलं ? वाचा एकाच पेजवर

Sachin Salve | Updated On: Oct 5, 2014 08:52 PM IST

सभांचा धडाका, कोण काय म्हटलं ? वाचा एकाच पेजवर

05 ऑक्टोबर : मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहेत तसा तसा भोंग्यांचा गोंगाट आणखी वाढलाय. सगळ्याचं पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावात सुरू झालाय. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदर्भ-मराठवाडा पिंजून काढत आहे. त्याच्या पाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंही विदर्भ-मराठवड्यात तंबू ठोकून आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणेंनी सभांचा सपाटा लावलाय. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ यांनी आक्रमक होतं सभा घेत आहे. आज रविवारी राज्यभरात प्रचाराची धुराळं उडतं आहे. या सर्वपक्षीय नेत्यांच्या सभेतील ही ठळक मुद्दे...

राज ठाकरेंच्या भांडुपमधील सभेतील ठळक मुद्दे

यंदा महाराष्ट्रात वेगळे चित्र असेल

महाराष्ट्रात राष्ट्रीय पक्षांची गरज नाही

महाराष्ट्राला स्वातंत्र्य नकोय तर स्वायत्तता हवी

चारही पक्षांना लोक नाकारतील - राज

भाजपच्या प्रत्येक होर्डिंगवर मोदी मग इथल्या नेत्यांचं काय झालं ?

मोदी म्हणाले गोपीनाथ मुंडे असते तर मला येण्याची गरज नव्हती, आता त्यांनीच इथल्या नेत्यांचा कमीपणा दाखवला

राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल - राज

भाजपचे उमेदवार आयात केलेले - राज

बाळासाहेबांमुळे भाजपला बळ - राज

घाटकोपरमध्ये आता फक्त 'हे राम', राज ठाकरेंनी राम कदमांना फटकारलं

पंतप्रधान झाल्यावर तरी बदलतील असं वाटलं होतं पण फक्त गुजरात...गुजरात - राज

ओबामा म्हणे केम छो...मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे? राज ठाकरेंचा सवाल

देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी चालतील पण गुजरातचा उदो उदो चालणार नाही - राज

बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद कशाला ?, मुंबई ते दिल्ली का नाही ? लवकर जाऊन काय तिथे ढोकळा खायचा ? -राज ठाकरे

एअर इंडियाचं ऑफिस गुजरातला हलवण्याचं ठरलं तेव्हा पृथ्वीराज चव्हाण का बोलले नाही ? का गप्प बसले ? -राज ठाकरे

पंतप्रधान झाल्यावर मोदी बदलतील वाटलं पण ते गुजरातच्या मुख्यमंत्री सारखंच वागताय -राज ठाकरे

टोलसाठी आंदोलन केलं होतं ते कुणासाठी केलं होतं. तेव्हा कुठे होते हे विरोधी पक्ष ? -राज ठाकरे

टोलवर किती खर्च होतो, किती पैसे जमा झाले हे कुणाला माहिती नाही-राज ठाकरे

सगळा पैसा सत्ताधार्‍यांना पोहचतो-राज ठाकरे

मनसेनं आंदोलन केलं म्हणून 44 टोल बंद झाले -राज ठाकरे

शिवसेना,भाजपने टोलसाठी का आंदोलन केलं नाही ? -राज ठाकरे

कोल्हापुरात जनतेनं आंदोलन केलं कुणी श्रेय लाटू नये, राज ठाकरेंचा सेनेला टोला

नाशिकमध्ये आयुक्त दिला नाही, फाईली रखडून ठेवल्या गेल्या, मग विकास कसा होणार ? -राज ठाकरे

नाशिकच्या गोदापार्कसाठी अंबानी, रतन टाटांशी चर्चा केली सगळ्यांना कामासाठी तयारी दाखवली पण हे काम रखडून ठेवलं -राज

पर्यटन विषयावर 12 लाख तरुणांना नोकर्‍या देऊ शकतो -राज

======================================================================

 • एलबीटी म्हणजे लुटो बाटो टॅक्स -मोदी

नरेंद्र मोदींच्या गोदिंयातील सभेतील ठळक मुद्दे

 • लोकसभा निवडणुकीत विश्वास टाकल्याबद्दल गोंदियाच्या जनतेचे आभार
 • मी कामदार -मोदी
 • राष्ट्रवादीची घडी जिथेच्या तिथेच, आज पण 10 वाजून 10 मिनिटं -मोदी
 • शरद पवार कृषीमंत्री असताना राज्यात आत्महत्या कशा झाल्यात ?-मोदी
 • महाराष्ट्रात सर्वात जास्त दहशतवादी घटना घडल्या उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त दंगली -मोदी
 • राष्ट्रवादी नव्हे भ्रष्टाचारवादी - मोदी
 • जनता हेच माझी हायकमांड - मोदी
 • प्रत्येक्ष क्षणाचा हिशेब द्यायला तयार - मोदी
 • काँग्रेस-राष्ट्रवादी या दोघांनाही शिक्षा करा - मोदी
 • राज्यात मिळणार्‍या प्रतिसादामुळेच विरोधक हादरले
 • शरद पवार हे चतूर नेते पराभवाची भीती असल्यानं पवार राज्यसभेवर गेले -मोदी
 • युतीचे दिवस संपले आता पूर्ण बहुमताचं सरकार आणा नरेंद्र मोदींच आवाहन
 • पाच वर्षात पहिल्यांदा महागाईचा दर कमी झालाय - मोदी
 • लवकरच मोठे निर्णय घेऊ - मोदी
 • पृथ्वीराज चव्हाण माझ्यासोबत एका व्यासपीठावरही येत नव्हते - मोदी
 • एलबीटी म्हणजे लुटो बाटो टॅक्स -मोदी
 • महाराष्ट्र आणि मुंबईशिवाय देशाची प्रगती नाही - मोदी
 • माओवाद्यांनी बंदुक ठेवून नांगर हाती घ्यावं, हिंसेचा मार्ग सोडावा, नरेंद्र मोदींचं आवाहन

======================================================================

गांधींना कोणी सोडलं ?- मोदी

मोदींची कोल्हापूरमध्ये सभेतील ठळक मुद्दे

 • मोदी एकटे नाही जनता त्यांच्या पाठिशी
 • सोन्याची चिमणी म्हणवला जाणारा देश जगभराच्या नजरेतून उतरला तो विरोधकांमुळे -मोदी
 • विरोधकांना गांधी नकोत तर गांधींचा शिक्का असलेल्या नोटा हव्यात -मोदी
 • गांधींना कोणी सोडलं ?- मोदींनी विचारला सवाल
 • काँग्रेस-राष्ट्रवादीत अस्वस्थतेचं वातावरण - मोदी
 • आम्ही गांधींना हिसकावून घेतल नाही तर काँग्रेसनं गांधींना सोडलं - मोदी
 • राज्यात निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादीला शोधायचं असेल तर सुक्ष्मदर्शिका घ्यावी लागेल -मोदींची खोचक टोला
 • शरद पवार राजकारणातले धुरीणी
 • पण जेव्हा नौका बुडणार हे कळलं तेव्हा त्यांनी पळ काढला शरद पवारांवर मोदींचे टीकास्त्र
 • माझ्या महाराष्ट्र दौर्‍यामुळे काँग्रेस -राष्ट्रवादी चिंतीत - मोदी

======================================================================

सेनेविरोधात बोलणार नाही - नरेंद्र मोदी

मोदींच्या सांगलीमधील सभेतील ठळक मुद्दे

 • सांगली सर्वात चांगली
 • लहान वयात ज्यांनी मला संस्कार दिले आणि ज्यांच्यावर मी पुस्तक लिहिलं ते लक्ष्मणराव इमानदार इथून 40 किमी दूर खटावचे
 • शरद पवार, तुम्ही छत्रपतींच्या गोष्टी करतात पण मुंबई विमानतळाला छत्रपतींचं नाव देण्याचा निर्णय वाजपेयी सरकारनं घेतला होता
 • तुमच्या चरित्रात शिवरायांचे गूण येण्याची शक्यताच नाही
 • पाण्याशिवाय तरंगणारे हे नेते असून हे हवेत तरंगतात
 • बाळासाहेबांच्या गैरहजेरीतली ही पहिली निवडणूक
 • बाळासाहेबांविषयी मला जो आदर आहे आणि सेना निर्माण करण्यासाठी त्यांनी तन मन ओतले
 • म्हणून मी निश्चित केलंय बाळासाहेबांविषयी सेनेवर बोलणार नाही
 • हीच माझी बाळासाहेबांना आदरांजली -मोदी
 • बाळासाहेबांच्या आदरार्थी सेनेविरोधात एक शब्दही बोलणार नाही- मोदी
 • हे राष्ट्रवादी नव्हेत हे भ्रष्टाचारवादी -मोदी

======================================================================

सांगलीत देवेंद्र फडणवीसांची आर.आर.पाटलांवर टीका

 • आर आर पाटील गृहमंत्री म्हणून तुम्ही काय काम केलंत ते जनतेला सांगा देवेंद्र फडणवीस यांचं आव्हान
 • सीसीटीव्हीचं काय, बुलेटप्रुफ जॅकेट विकत घेऊ शकलात नाहीत
 • सत्ता आल्यास एलबीटी हद्दपार करणार - देवेंद्र फडणवीस

======================================================================

- अच्छे दिनचं काय झालं ? - राणे

औरंगाबादमध्ये नारायण राणेंच्या सभेतील ठळक मुद्दे

 • - नारायण राणेंची पंतप्रधानांवर टीका -अच्छे दिनचं काय झालं?
 • - खोटे बोला पण रेटून बोला ही मोदींची निती
 • - छत्रपतींचा आशीर्वाद गुजरातला कसा मिळेल?
 • - छत्रपती तर आम्हांलाच आशीर्वाद देतील
 • - गुजरातवाले पक्के व्यापारी आहेत, सावध राहा
 • - मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा मोदींचा डाव

======================================================================

नंदूरबारमध्ये पृथ्वीराज चव्हाणांची सभा

 • भाजप-राष्ट्रवादीचं साटलोटं
 • संपूर्ण सत्ता आरएसएसच्या ताब्यात देण्याचा भाजपचा प्रयत्न

======================================================================

वर्ध्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ

 • - जाहिरातीत शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागणार्‍यांनी कधी कधी शिवजयंती साजरी केलीये का?
 • - अमित शहांच्या सभेतही शिवाजी महाराजांना विसरले
 • - 'महाराष्ट्र माझा' म्हणणार्‍यांनी फक्त घोटाळे केले, काँग्रेस- राष्ट्रवादीवर उद्धव ठाकरेंची टीका
 • - भारताचा तुकडा पाकिस्तानकडून कधी परत आणणार उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल
 • - विदर्भ विकासापासून कोसो दूर आहे
 • - अनेक घरांपर्यंत साधी वीजही पोहोचलेली नाही
 • - आम्ही विदर्भाचा विकास करू मात्र महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा होऊ देणार नाही
 • - मुलांच्या पाठीवरचं ओझं दूर करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं
 • - म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना टॅबलेट देणार आहोत
 • - नागपूरला 'ट्रान्सपोर्ट हब' करणार
 • - महाराष्ट्राला भारनियमनमुक्त करणार - उद्धव ठाकरे

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2014 06:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close