S M L

' टीम मनमोहन 'चा शपथविधी : नवे आणि जुने चेहरे झळकले

28 मे गेल्या तीन दिवसांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनंतर अखेर आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा दुसर्‍या टप्प्यातला विस्तार झाला. राष्ट्रपती भवनातल्या अशोका हॉलमध्ये दुसर्‍या टप्प्यातल्या शपथविधी कार्यक्रमाला सकाळी अकरा वाजता राष्ट्रगीताने सुरुवात झाली. एकूण 59 मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली.दुसर्‍या टप्प्यातल्या शपथविधीच्या शानदार सोहळ्याला युपीएमधले अनेक मान्यवर उपस्थित होते. आम्ही इश्वराला स्मरून शपथ घेतो की... असं म्हणत जसजसा एकेकजण गोपनियतेची आणि त्यांच्यापदाची शपथ घेत होता तसतसे शपथ घेणार्‍या प्रत्येक उमेदवाराच्या चेहर्‍यावर आनंद, अभिमान, भीती, किंचत गोंधळ पण भरपूर जबाबदारी असे संमिश्र भाव पहायला मिळत होते. अनेक नवे-जुने चेहरे आजच्या शपथविधी कार्यक्रमाच्यावेळी पहायला मिळाले.दुसर्‍या टप्प्यातल्या शपथविधी नंतर नव्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची एकूण संख्या 78 झाली आहे. घटनेनुसार मंत्रिमंडळाची मर्यादा 81 आहे. 14 कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र कार्यभार असणारे 7 राज्यमंत्री, तर 38 राज्यमंत्री आज शपथ घेतली. पंतप्रधानांसह 19 कॅबिनेट मंत्र्यांनी यापूर्वीच शपथ घेतली आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांची एकूण संख्या 32 झालीय. यावर्षी निवडणुका होणार असलेल्या राज्यांना मंत्रिमंडळात झुकतं माप देण्यात आलं आहे. तामिळनाडूने 10 मंत्रिपदं पटकावली आहेत. तर महाराष्ट्राला 9 मंत्रिपदं मिळाली आहेत. दुसर्‍या टप्प्यातल्या शपथविधीनंतर अनेक मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दुसर्‍या टप्प्यातल्या शपथविधीमध्ये महाराष्ट्राचे 6 मंत्री होते. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, विदर्भातले मुकुल वासनिक, गुरूदास कामत, पृथ्वीराज चव्हाण, प्रतीक पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होता. या आधी म्हणजे 22 मेला केंद्रीय कृषी मंत्री म्हणून शरद पवार, तसंच केंद्रीय मंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे आणि मुरली देवरा यांनी शपथ घेतली. यंदा मंत्रिमंडळात पहिल्यांदाच गुरुदास कामत यांचा समावेश करण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री पवनकुमार बन्सल मुकूल वासनिक कांतिलाल भुरिया एम . के . अझागिरी वीरभद्र सिंग फारूक अब्दुल्ला विलासराव देशमुख दयानिधी मारन ए राजा मल्लिकार्जून खडगे कुमारी शैलजा सुबोध कांत सहाय एम. एस. गिल जी. के. वासन स्वतंत्र खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री कृष्णा तीर्थ प्रफुल्ल पटेल श्रीप्रकाश जैसवाल पृथ्वीराज चव्हाण दिनशा पटेल जयराम रमेश सलमान खुर्शिद केंद्रीय राज्यमंत्री व्ही . नारायणस्वामी ई . अहमद मलपल्ली रामचंद्रन श्रीकांत जेना प्रंबका लक्ष्मी डी . पुरंदेश्वरी के . एच . मुनियप्पा अजय माकन ज्योतिरादित्य शिंदे नामो नरेन मिना ए . साई प्रताप जतीन प्रसाद एम . एम . पल्लम राजू गुरुदास कामत हरिश रावत महादेव खंडेल सुगाता राय प्रा . के . व्ही . थॉमस सिसिर अधिकारी दिनेश त्रिवेदी मुकुल रॉय सुलतान अहमद एस . पालनीमनीकम डी . नापोलीन मोहन जटुआ एस . गांधीसेल्वम प्रनीत कौर सचिन पायलट शशी थरूर डॉ . एस . जगतरक्षकन तुषारभाई चौधरी अरुण यादव प्रतीक पाटील आर . पी . एन . सिंग भारतसिंह सोळंकी विन्सेट पाला प्रदीप जैन अगाता संगमा मनमोहन सिंग यांच्या टीमचा विस्तार झाला. 59 मंत्र्यांचा होणार शपथविधी झाला. शशी थरुर,सचिन पायलट यांच्यासह 29 नव्या चेहर्‍यांना संधी आली. तर काही जाणत्या अनुभवी नेत्यांचा शपथविधी झाला. शपथ घेतलेल्या त्या मंत्र्यांविषयी थोडंसं फारुख अब्दुल्ला : सध्या कॅबिनेट मंत्री. काश्मिरी राजकारणात फारूख अब्दुल्ला यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. 1980पासून ते फारूख अब्दुल्ला हे काश्मिरी राजकारणात सक्रिय आहेत. पेशाने फारुख अब्दुल्ला हे डॉक्टर आहेत. 21 ऑगस्ट 1981 ला नॅशनल कॉन्फरनच्या अध्यक्षपदी फारूख अब्दुल्ला यांची निवड झाली. फारुख अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री होते. पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. दयानिधी मारन - सध्या कॅबिनेट मंत्री. यंदाची निवडणूक त्यांनी मध्य चेन्नई मतदारसंघातून लढवली आहे. ते माजी माहिती आणि दळणवळण मंत्री होते. माजी माहिती आणि दळणवळण मंत्री असताना त्यांनी मोबाईल कॉलच्या दरात घट केली होती. ए. राजा - सध्या कॅबिनेट मंत्री. डीएमकेतील वरिष्ठ नेते अशी ए. राजा यांची ओळख आहे. यंदा तामिळनाडूतल्या निलगिरी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. ते माजी माहिती आाणि दळणवळण मंत्री राहिले होते. श्रीलंकेतल्या तामिळ नागरिकांच्या हत्त्येचं कारण दाखवून 17 ऑक्टोबर 08 मध्ये त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांच्याकडे सोपवला. त्यांच्या राजीनाम्यामुळे डी.एम.के नेत्यांनी सांघिक राजनामा दिला होता. आणि युपीएतली ती सगळ्यात मोठी घटना होती. कुमारी शैलजा - सध्या कॅबिनेट मंत्री. 1991 आणि 1996मध्ये त्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्या माजी राज्यमंत्री राहिल्या आहेत. नरसिंहरावांच्या काळात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. नागरीनिवारा मंत्री आणि दारिद्र्यनिर्मुलन मंत्री तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. डॉ.एम.एस.गिल - सध्या कॅबिनेट मंत्री. यंदा त्यांनी पंजाबमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांनी काँग्रेसतर्फ युवक आणि क्रीडमंत्री पदाचा कार्यभार सांभळला होता. माजी निवडणूक आयुक्त म्हणूनही त्यांनी काम सांभाळलं होतं. त्यांना पद्मविभूषणाने पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 6 एप्रिल 08 मध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र प्रभार सांभाळला होता. जी.के वासन - सध्या कॅबिनेट मंत्री. काँग्रेसचे दिवंगत जी.के. मूपनार यांचे जी.के.वासन हे पूत्र आहेत. माजी सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांनी माजी रोजगार मंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सांभळा होता. ते तामिळ मनिला काँग्रेसमध्ये होते. तामिळनाडू मनिला काँग्रेस काँग्रेसमध्ये विसर्जित झाल्यानंतर तामिळनाडू क्राँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. पवनकुमार बंसल - सध्या कॅबिनेटमंत्री. यंदा त्यांनी चंदिगढमधून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. 1984 ते 1990 राज्यसभा सदस्य होते. 1991मध्ये ते दहाव्या लोकसभेवर निवडून आले होते. 1999मध्ये ते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी होते. चंदीगढमधून त्यांनी 4 वेळा खासदारकी मिळाली होती. याआधी ते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री होते. सलमान खुर्शीद - सध्या स्वतंत्र खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री. डॉ.झाकिर हुसेन यांचे ते नातू आहेत. पेशानं वकील असणारे सलमान खुर्शीद हे उत्तरप्रदेश काँग्रेस समिती माजी अध्यक्ष होते. लोकसभेवर निवडून जाण्याची त्यांची दुसरी खेप होती. ते माजी केंद्रीय मंत्री होते. इंदिरा गांधींच्या काळात पंतप्रधान कार्यालयात त्यांनी विशेष जबाबदारीची कामं केली होती. 1993 ते 96 या काळात त्यांनी परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. दीनशा पटेल - सध्या स्वतंत्र खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री. 1996 साली त्यांनी 11 व्या लोकसभेची निवडणूक लढवली होती. आतापर्यंत ते पाचवेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी गुजरात राज्याच्या पेट्रोलियम खात्याचा कार्यभार सांभाळला आहे.ज्योतिरादित्य शिंदे - सध्या केंद्रीय राज्यमंत्री. 2002मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते. 2004च्या 14व्या लोकसभेच्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा निवडून आले होते. तेव्हा त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्रालयाचा पदाभार सांभळला होता. माधवराव शिंदेचे पुत्र आणि विजयाराजे शिंदेचे ज्योतिरादित्य नातू आहेत. डी. पुरंदेश्वरी - सध्या केंद्रीय राज्यमंत्री. एन.टी.रामाराव यांच्या द्वितीय कन्या. 2004 मध्ये आंध्रप्रदेशातील बापत्ला मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडणूक लढवली होती. तर यंदा 2009मध्ये विशाखापट्टणममधून लोकसभेवर निवडणूक लढवली होती. श्रीमती पनबक्का लक्ष्मी - सध्या केंद्रीय राज्यमंत्री. 2004मध्ये नेल्लोर या मधून लोकसभेवर दोनवेळा निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी बाप्टलामधून लोकसभेवर निवडणूक लढवली होती. सचिन पायलट - सध्या केंद्रीय राज्यमंत्री. दिवंगत काँग्रेस नेते राजेश पायलट यांचे पुत्र. चौदाव्या लोकसभेतले सचिन पायलट हे सर्वात तरुण खासदार होते. त्यावेळी त्यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाचं कामं पाहिलं होतं. यंदा त्यांनी राजस्थानातल्या अजमेर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.शशी थरूर - सध्या केंद्रीय राज्यमंत्री. 2002 ते 2007 संयुक्त राष्ट्रांसाठी भारताचे उपसचिव होते. 2006 संयुक्त राष्ट्रांसाठी भारताचे सचिव म्हणून निवड ( माहिती, जनसंपर्क) झाली होती. रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीवर सल्लागार म्हणून आहेत. नेहरू: द इन्व्हेन्शन ऑफ इंडिया हा नेहरूंवर चरित्रग्रंथ लिहिला होता. रिझन ऑफ स्टेट, इंडिया : फ्रॉम मिडनाईट टू द मिलेनिअम, केरला: गॉड्स ओन कंट्री, यासारखी नऊ पुस्तकं प्रकाशित झाली असून काही लघुकथा आणि ललित लेखांची पुस्तकंही प्रसिद्ध झाली आहेत. अगाथा संगामा - सध्या केंद्रीय राज्यमंत्री. 27 वर्षांच्या अगाथा संगामा ह्या 15व्या लोकसभेतल्या सर्वात लहान खासदार आहेत. लोकसभा अध्यक्ष पी. ए.संगमा यांची कन्या असणा-या अगाथांनी दोन वेळा तुरा मतदासंघातून बहुमताने निवडून आल्या. पुणे विद्यापीठाच्या अखत्यातरीत येणा-या एल.एस.लॉ कॉलेजमधून एलएलबी पूर्ण केलं. तर युकेतल्या नॉटिंगहॅम विद्यापीठातून एन्व्हारन्मेंटल मॅनेजमेंट या विषयातून एम.ए.पूर्ण केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2009 09:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2009 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close