S M L

पैसेवाटप प्रकरणी विद्यमान आमदाराला अटक आणि जामीन

Sachin Salve | Updated On: Oct 5, 2014 06:28 PM IST

पैसेवाटप प्रकरणी विद्यमान आमदाराला अटक आणि जामीन

ghandat05 आक्टोबर : परभणी जिल्ह्यात गंगाखेड मतदारसंघात मतदारांना पैसेवाटप होत असल्याच्या आरोपावरून विद्यमान आमदार सीताराम घनदाट यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आणि आज त्यांची जामिनावर सुटका झाली. पण या अटकेमुळे परभणीमध्ये एकच खळबळ माजलीय.

निवडणुकीच्या रणधुमाळीत पैशांचा व्यवहार रोखण्यासाठी पोलीस आणि आयोग डोळ्यात तेल घालून पहारा घालत आहे. पण राज्यात कोट्यवधी रुपये सापडण्याच्या घटना घडत आहे. परभणीमध्ये 2 ऑक्टोबर रोजी गंगाखेड मतदारसंघामध्ये तांदुळवाडी इथं 27 हजार रुपये आणि मतदारयाद्या जप्त केल्या होत्या. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना ताब्यात घेतले होते. याच प्रकरणी घनदाट यांच्या घराची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. दरम्यान, याच मतदारसंघातील दुसरे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यकर्त्यालाही पैसवाटप करताना करताना अटक करण्यात आली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2014 06:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close