S M L

युती तोडताना आदरभाव कुठे गेला होता?- शिवसेना

Samruddha Bhambure | Updated On: Oct 6, 2014 03:54 PM IST

युती तोडताना आदरभाव कुठे गेला होता?- शिवसेना

06 ऑक्टोबर : जागावाटपाच्या मुद्द्यावरून युती तुटत असताना शिवसेनाप्रमुखांबद्दलचा आदरभाव कुठे गेला होता? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. जागावाटपाचा वाद ताणून न धरता बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच शिवसेनाप्रमुखांना खरी श्रद्धांजली ठरली असती असंही उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपल्या मनात आदर आहे. त्यांना आदरांजली म्हणूनच आपण शिवसेनेच्या विरोधात एकही शब्द बोलणार नाही असं मत नरेंद्र मोदींनी काल (रविवारी) सांगलीतल्या तासगावमध्ये झालेल्या प्रचार सभेत स्पष्ट केलं होतं. त्यावर आज शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून प्रत्यूत्तर देण्यात आलं आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुखांबद्दल आदर असेल तर चांगलेच आहे. त्याचे स्वागत आहे. आम्हीही नरेंद्र मोदी यांचा आदरच करतो. मात्र हिंदुत्वाच्या घट्ट धाग्याने बांधलेली आणि शिवसेनाप्रमुखांनी 25 वर्षे अभेद्य ठेवलेली शिवसेना-भाजप युती यावेळीच कशी तुटली? केवळ जागावाटपाच्या मुद्यावरून युती तुटत असताना शिवसेनाप्रमुखांबद्दलचा आदरभाव कुठे गेला होता? किंबहुना जागावाटपाचा वाद ताणून न धरता, सामंजस्य दाखवून शिवसेना - भाजप युती अभेद्य ठेवली असती तर तीच शिवसेनाप्रमुखांना खरी श्रद्धांजली ठरली असती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2014 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close