S M L

माझा पराभव करण्यासाठी पंतप्रधानांना यावं लागलं -पाटील

Sachin Salve | Updated On: Oct 6, 2014 03:44 PM IST

माझा पराभव करण्यासाठी पंतप्रधानांना यावं लागलं -पाटील

r r patil on bjp06 ऑक्टोबर : माझा पराभव करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तासगावामध्ये आणावं लागतं हीच का तुमची लढाई असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांनी भाजपला लगावला. तसंच आर आर पाटील यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आर.आर.पाटील यांची पाठ थोपाटली. ते सांगलीत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगलीमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती. त्यांच्या टीकेचा समाचार घेत आर.आर.पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. माझ्या पराभवासाठी देशाच्या पंतप्रधानांना प्रचारासाठी आणावं लागतं यावरूनच भाजपची काय ताकद आहे ते दिसून येतंय असा टोला त्यांनी भाजपला लगावला. तर शरद पवारांनीही मोदींवर सडकून टीका केली. नरेंद्र मोदी यांनी आर.आर.पाटील यांच्या विरोधात मतदारसंघात सभा घेतली. मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो. आमचा आर.आर.पाटील दिसायला गडी लहान आहे. पण कर्तुत्वाने त्याचा कुणी हात धरणार नाही. देशाचा पंतप्रधानांना यावं किंवा अन्य कुणी यावं पण आर आर पाटील समोरच्याला धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नाही. याच्या बद्दल माझ्या मनात शंका नाही अशी पाठराखण शरद पवारांनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2014 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close