S M L

राज ठाकरेंनी दिला बाबासाहेब पुरंदरेंना पाठिंबा

29 मे राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंना पाठिंबा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सखोल संशोधन करून हजारो पानांचा इतिहार जिवंत करणार्‍या बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर उचलणार्‍या जाणार्‍या हातांचा आम्ही बंदोबस्त करू असं राज ठाकरे यांनी एका पत्रकात म्हटलं आहे. मुंबईत उभारल्या जाणार्‍या शिवस्मारकाच्या समितीवर बाबासाहेब पुरंदरे यांना घ्यायला मराठा संघटनांनी विरोध केला होता. बाबासाहेबांवर त्यांनी वैयक्तिक टीकाही केली होती. त्या टीका करणार्‍यांच्या विरोधात राज ठाकरे यांनी पत्रक काढलं आहे. त्या पत्रकात 'महाराष्ट्र जातींमध्ये फोडण्याचा नीच प्रयत्न काही लोक करतायत ', असंही त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 'पुरंदरे ब्राम्हण आहेत, त्यात त्यांचा काय गुन्हा?' असा सवालही त्यांनी विचारलाय. राज यांनी या पत्रकात पुरूषोत्तम खेडेकर, विनायक मेटे आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्यावरही टीका केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2009 08:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2009 08:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close