S M L

सोलापूरमध्ये खासगी बस नदीपात्रात कोसळून 8 ठार

Samruddha Bhambure | Updated On: Oct 7, 2014 10:02 AM IST

सोलापूरमध्ये खासगी बस नदीपात्रात कोसळून 8 ठार

07 ऑक्टोबर :  सोलापूर जिल्ह्यात आज पहाटे एक खासगी बस नदीपात्रात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण जागीच ठार झाले आहेत तर 15 जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये 6 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे.

करमाळा-टेंभुर्णी रोडवर शिर्डीवरून पंढरपूरला जाणारी खासगी बस नदीपात्रात कोसळल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. या बसमधले सर्व प्रवाशी आंध्र प्रदेशातले रहिवासी आहेत. जखमींना टेंभुर्णी आणि करमाळा इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान पोलीस आणि गावकर्‍यांकडून मदतकार्य सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2014 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close