S M L

बीडमध्ये सेनेच्या जाहिरातीत गोपीनाथ मुंडेंचा फोटो

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2014 03:17 PM IST

बीडमध्ये सेनेच्या जाहिरातीत गोपीनाथ मुंडेंचा फोटो

beed sena hoarding07 ऑक्टोबर : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे महायुतीला जोडणार दुवा होते असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभांमधून सांगत आहे. पण, बीडमध्ये शिवसेनेच्या जाहिराती आणि होर्डिंग्सवर शिवसेना नेत्यांबरोबर गोपीनाथ मुंडे यांचा फोटोही लावण्यात आलाय.

मुंडेसाहेबांबद्दल आदर असल्यामुळे त्यांचा फोटो लावल्याचं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. बीडमध्ये उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा होणार आहे. या सभेसाठी शहरभर होर्डिंग्ज्स लावण्यात आले आहेत. या होर्डिंग्जवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटोही आहे.

पण, अशाप्रकारे शिवसेनेच्या जाहिरातीत भाजपचा फोटो असल्यानं बीडमध्ये सेना-भाजप छुपी युती असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. सामान्य मतदारांमध्ये मात्र यामुळे संभ्रम निर्माण झालाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2014 03:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close