S M L

महाराष्ट्र तोडण्यासाठी शिवरायांचा आशीर्वाद हवाय का ?-उद्धव

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2014 10:30 PM IST

महाराष्ट्र तोडण्यासाठी शिवरायांचा आशीर्वाद हवाय का ?-उद्धव

07 ऑक्टोबर : एकीकडे मोदी म्हणता महाराष्ट्र तोडणार नाही तर दुसरीकडे यांच्याच पक्षाचे गडकरी आणि फडणवीस विदर्भ तोडण्याची भाषा करत आहे. शिवरायांचा आशीर्वाद यासाठीच पाहिजे का ? महाराष्ट्र तोडू पाहणार्‍यांना तुम्ही मत देणार का ? असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. तसंच गोपीनाथ मुंडेंना भाजपमध्ये खूप सहन करावं लागलं, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. ते बीडमध्ये बोलत होते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचा झंझावात सुरू आहे. आज बीडमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला.मी भाजप विरोधात बोलणारच. एका बाजूला महाराष्ट्र तोडणारे भाजपवाले बसले आहे आणि धुळ्यात मोदी म्हणतात, मी जोपर्यंत पंतप्रधानपदावर आहे तोपर्यंत महाराष्ट्र तुटू देणार नाही. त्यांचं म्हणणं मानलं. पण दुसरीकडे 10 मिनिटांच्या आता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये म्हणतात मोदी मुंबईबद्दल बोलले होते. आम्ही विदर्भ वेगळा करणार म्हणजे करणारच, महाराष्ट्र तोडणारच ही एकीकडे लुटालूट आणि तोडणार्‍यांची टोळी बसलेली आहे त्यांना मतदान करणार का ? शिवरायांचा आशीर्वाद पाहिजे यांना महाराष्ट्र तोडण्यासाठी आशीर्वाद पाहिजे का ? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. मुंडे केवळ भाजपचे नेते नव्हते तर ते लोकनेते होते. सगळे मित्र लोकसभेला होते आता ते सगळे पळाले. गोपीनाथ मुंडे असते तर यायची गरज नव्हती. जागावाटप करत असताना मुंडे प्रेमाने जागा वाढवून मागायचे आणि बाळासाहेब देखील जागा वाढवून द्यायचे अशी आठवण उद्धव यांनी काढली. तसंच मुंडेंच्या मृत्यूची मी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ऑक्टोबर आला तरी अजून चौकशीचा पत्ता नाही. मुंडे होते तेव्हा त्यांना खूप सहन करावं लागलं. आता त्यांच्याबद्दल इतरांना खूप पुळका आलाय असं सांगत उद्धव यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावल्

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2014 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close