S M L

कुठे आहे अच्छे दिन ? -मायावती

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2014 06:11 PM IST

कुठे आहे अच्छे दिन ? -मायावती

mayawati_in_nashik07 ऑक्टोबर : आज बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांची नाशिकमध्ये सभा पार पडली. या सभेत मायावतींनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर भाजपवरही सडकून टीका केली.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अच्छे दिनची आश्वासनं दिली होती. पण कुठे आले अच्छे दिन असा सवाल बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींनी मोदींना केलाय. इतर पक्षांसारखे आम्ही फसवे जाहीरनामे प्रकाशित करत नाही. आम्ही कृती करुन दाखवतो असंही मायावतींनी म्हटलंय.

प्रत्येक पक्षानं गरिबी हटावचा फक्त नारा दिला. पण कुठल्याही राजकीय पक्षानं गरिबी हटवली नाही. त्यामुळे या पक्षांना मत देऊन सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात देऊ नका असं आवाहन मायावतींनी केलं.

मायावतींच्या भाषणातील ठळक मुद्दे

- स्वातंत्र्यापासून काँग्रेस आणि भाजप आणि अन्य विरोधी पक्षांनी सत्ता गाजवली

- पण एवढ्या काळात गरीब आणि बहुजन, मागासलेल्या जाती-जमाती,

- अल्पसंख्यांक यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत बदल झालेला नाही

- या वर्गातील गरिबी आणि बेरोजगारी आजही कायम

- आरक्षणाच्या हक्कांची चलाखीने संकोच करण्यात येतोय

- उच्च वर्गातील गरिबांचीही हिच स्थिती होईल

- बहुजन आणि आर्थिक मागासवर्गीयांना रोजगार मिळावा ही मागणी केंद्राकडे केली.

- केंद्राच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा गरिबांना फटका

- देशातील मुठभर भांडवलदारांपलीकडे गरिबांचा विकास व्हावा,गरिबी आणि बेरोजगारी हटावी

- केंद्राने वर्षानुवर्ष योजना राबवूनही गरिबी कमी झालेली नाही

- सर्व पातळ्यांवर भ्रष्टाचार वाढलाय, महाराष्ट्रही ह्याला अपवाद नाही

- बड्या मुठभर धनाढ्यांच्या मदतीने आत्तापर्यंत केंद्रात आणि राज्यातील सत्ता आली

- त्यामुळे सत्ताधार्‍यांनी बड्या धनिकांच्या बाजूने कामं केली

- गरीब, बहुजनांची गरिबी कोणीही हटवली नाही

- म्हणून काँग्रेस,भाजप आणि इतर सत्ताधारी पक्षांना पुन्हा सत्तेत येऊ देऊ नका

- बसपा ही एकमेव पार्टी, बड्या धनाढ्यांचा उद्योगपतींच्या मदतीने सत्ते न येणारी तर सामान्यांच्या पैशावर निवडणूक लढवणारी

- उत्तर प्रदेशात आम्ही सर्व समाजाच्या हिताच्या, त्यातही कमजोर वर्गांना प्राधान्य देऊन काम केले

- सत्ताधार्‍यांच्या जातीवादी मानसिकतेमुळे मागास वर्गांची आणि अल्पसंख्यांक वर्गाची उपेक्षा

- भुमीहिनांना जमीन देण्यासाठी शेतकर्‍यांची जमीन हिसकावून घेतली नाही

- सरकारी पडिक जमिनीचे पट्टे पाडून भूमीहिनाना दिली.

- सर्व जनहिताय आणि सर्व जन सुखाय या धोरणाने समता धिष्ठीत समाज निर्मितीसाठी काम करू

- मोंदीनी सुद्धा इतर पक्षाप्रमाणे निराशा केली

- अच्छे दिन आयेंगे अशी खोटी आश्वासनं दिली

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2014 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close