S M L

इंदापूरजवळ तब्बल 5 कोटींची रोकड जप्त

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2014 08:36 PM IST

इंदापूरजवळ तब्बल 5 कोटींची रोकड जप्त

indapur07 ऑक्टोबर : निवडणुकीच्या काळात पैसे वाटण्याचे आणि जप्त होण्याचे प्रकार समोर येत आहे. इंदापूरजवळ काळेवाडीत तब्बल 5 कोटींची रोकड निवडणुकीच्या भरारी पथकाने पकडली होती.

तब्बल 5 कोटींची रक्कम ही एका साध्या जीपमध्ये नेण्यात येत होती. पण ही रक्कम सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची असल्याचं समजतंय. रोकड सापडल्यानंतर बँकेकडून कागदपत्रं मागवण्यात आली आहे त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होऊ शकेल अशी माहिती इंदापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले यांनी दिलीय.

मात्र या प्रकरणामुळे काही प्रश्न अनुत्तरीत राहतात. सुरक्षा नसताना एवढी मोठी रक्कम नेण्याची जोखिम का उचलली गेली आणि सोलापूर डीसीसी बँकेची रक्कम पुणे जिल्ह्यात कशासाठी पाठवण्यात आली याची उत्तर मात्र अजून मिळू शकली नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2014 08:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close