S M L

...तर चव्हाणांना लोकांनी डोक्यावर घेतलं असतं -पवार

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2014 09:11 PM IST

...तर चव्हाणांना लोकांनी डोक्यावर घेतलं असतं -पवार

ajit pawar on chavan parbhani07 ऑक्टोबर : पृथ्वीराज चव्हाणांनी सत्ता असताना लोकांच्या हिताची कामं केली असती, त्यांच्या फाईलींवर सह्या केल्या असत्या तर आज जनतेने त्यांना डोक्यावर उचलून घेतलं असतं, असा खोचका टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना लगावला. ते पूर्णामध्ये झालेल्या प्रचारसभेत बोलत होते.

या सभेत त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केलं. सत्तेमध्ये होते तेव्हा कामे करणे गरजेचे असते. आता काँग्रेसची जाहिरात पाहिली. त्यात पृथ्वीराज चव्हाण सह्या करत आहे.

पण अगोदर त्यांनी असं केलं नाही. आज मात्र जाहिरातीतून सह्या केल्या जात आहेत. जर हेच काम अगोदर केलं असतं तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं असा टोला पवारांनी लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2014 09:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close