S M L

केज मतदारसंघात रंगणार महिला उमेदवारांचा सामना

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2014 11:35 PM IST

केज मतदारसंघात रंगणार महिला उमेदवारांचा सामना

beed kej07 ऑक्टोबर : राज्यात विधानसभा निवडणुकीत अनेक लक्षवेधी लढती होणार आहे. पण मराठवाड्यातल्या बीडमधल्या केज या मतदारसंघातली लढत महिला उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होत आहेत.

संपूर्ण राज्यात अशी महिलांमध्ये होणारी ही एकमेव लढत आहे. चारही प्रमुख पक्षांनी महिला उमेदवार दिले आहेत आणि तेही मतदारसंघ महिलांसाठी राखीव नसताना. या मतदारसंघातून शिवसेनेच्या कल्पना नरहिरे, काँग्रेसच्या अंजली घाटगे,भाजपच्या संगीता ठोंबरे आणि राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा रिंगणात आहेत.

यातल्या कल्पना नरहिरे या सोडल्या तर उरलेल्या तीनही उमेदवार नवख्या आहेत. तर नमिता मुंदडा या राज्याच्या माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या सून आहेत. त्यामुळे केजचा आखाड्यात कोण बाजी मारणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

अशी आहे केजची लढत

  • कल्पना नरहिरे- शिवसेना
  • अंजली घाटगे- काँग्रेस
  • संगीता ठोंबरे-भाजप
  • नमिता मुंदडा- राष्ट्रवादी

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2014 11:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close