S M L

भुजबळांनी दिला नारा, 'अब की बार शरद पवार'

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2014 11:53 PM IST

भुजबळांनी दिला नारा, 'अब की बार शरद पवार'

bhujbal on pawar307 ऑक्टोबर : यावेळी राष्ट्रवादीचं 100 टक्के सरकार येणार आहे आणि शरद पवारांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी मी करणार आहे असं सांगत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 'अब की बार शरद पवार' असाच नाराच दिलाय. ते श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीवरून युती तुटली आणि आघाडीही फुटली. चारही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले आहे. पण अजूनही मुख्यमंत्रिपदाची शर्यत संपलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्रिपदासाठी चक्क पक्षाध्यक्ष शरद पवारांचंच नाव पुढं केलंय. शरद पवारांना मुख्यमंत्री व्हा म्हणून सांगणार असं भुजबळ म्हणाले. सोशल मीडिया आणि व्हाटस ऍपवर सध्या जाहिरातींचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी 'अब की बार शरद पवार ' पसरू द्या असं जाहीर आवाहन भरसभेत कार्यकर्त्यांना केलं. कार्यकर्त्यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळत 'अब की बार शरद पवार' घोषणांनी मैदान दणाणून सोडले. भुजबळांच्या या नव्या भूमिकेमुळे दादांना शह देण्यासाठी भुजबळांनी असं वक्तव्य केलं का याची चर्चा आता सुरू झालीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2014 11:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close