S M L

विधानसभा निवडणुकीतही 'नमो' X 'रागा'

Samruddha Bhambure | Updated On: Oct 8, 2014 01:43 PM IST

rahul vs modi54q

08 ऑक्टोबर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नमो विरुद्ध रागा असं युद्ध आता विधानसभेतही रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीही आजपासून राज्यात प्रचाराला सुरुवात करणार आहेत. राहुल गांधी यांच्या आज महाष्ट्रात दोन जाहीर सभा होणार आहेत.

रायगड जिल्ह्यातल्या महाड आणि लातूर जिल्ह्यातल्या औसामध्ये राहुल गांधींची सभा होणार आहेत. महाडच्या परांजपे हायस्कूल मैदानात राहुल गांधी दुपारी 12 वाजता आणि दुपारी सव्वातीन वाजता लातूरच्या औसामध्ये सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदींनी याआधीच भाजपच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. राज्यात मोदींच्या आत्तापर्यंत 12 सभा झाल्या आहेत.

दुसरीकडे उद्धव ठाकरे आज कोकण दौरा करणार आहेत. भाजपचे नेते अमित शहा उत्तर महाराष्ट्रात, तर सुषमा स्वराज यांच्याही राज्यात दोन सभा होणार आहे. शरद पवार मुरबाडमध्ये तर अजित पवार यवतमाळमध्ये सभा घेणार आहेत.

आज राज्यात प्रचार शिगेला

 • राहुल गांधी - दुपारी साडे बारा वाजता महाडमध्ये सभा आणि साडे तीन वाजता औसा, लातूरमध्ये सभा
 • उद्धव ठाकरे - कोकण दौरा - आजच्या दिवसात 3 सभा - वेंगुर्ला, मालवण आणि रत्नागिरी
 • राज ठाकरे - भिवंडी आणि ठाणे
 • अमित शहा - नंदुरबार, धुळे आणि चाळीसगाव
 • सुषमा स्वराज - मिरज आणि सांगली
 • पंकजा मुंडेंच्या आज चार सभा आहेत. दौंड, बारामतीतलं माळेगाव, सातारा आणि पुणे शहरात एक सभा.
 • एकनाथ खडसे - नंदुरबार जिल्ह्यातलं शहादा आणि धुळे जिल्ह्यातलं शिरपूर
 • देवेंद्र फडणवीस - आज तीन सभा - वाई, कोल्हापूर जिल्ह्यातलं उचगाव आणि पुणे
 • शरद पवार - मुरबाड
 • अजित पवार - यवतमाळ
 • सुप्रिया सुळे - जुन्नर आणि हडपसर

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2014 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close