S M L

कंत्राट मंजूर करण्याचा होता आग्रह, चव्हाणांचे दादांकडे बोट !

Sachin Salve | Updated On: Oct 8, 2014 05:18 PM IST

कंत्राट मंजूर करण्याचा होता आग्रह, चव्हाणांचे दादांकडे बोट !

08 ऑक्टोबर : विरोधकांनी केलेले आरोप हे हेतुपस्पर आहे. माझ्या चार वर्षांच्या कारकिर्दीत 37 हजार फाईली क्लिअर केल्या आहेत. कुणी म्हणतं सह्या केल्यात नाही मग काम कशी झाली याचं कोडं मला सुटलेलं नाही असं स्पष्टीकरण राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं. तसंच ऐन निवडणुकीच्या घोषणेअगोदर काही कंत्राट मंजूर करण्याचा आग्रह केला होता असा गौप्यस्फोटही चव्हाणांनी अजित पवारांचं नाव न घेता केला. आयबीएन लोकमतच्या 'भविष्य महाराष्ट्राचं' कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकारी संपादक मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांच्याशी दिलखुलास बातचीत केली. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

'क्लिन मिनिस्ट' अशी प्रतिमा लाभलेले पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावर असताना आणि पदावरून पायउतार झाल्यानंतरही टीकेला सामोरं जावं लागलं. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरला, फाईलींवर सह्याच केल्या जात नाही, निवडणुकीच्या अगोदर फाईली मंजूर केल्या गेल्यात अशा टीकेची झोडचं विरोधकांनी उठवली होती. एव्हाना विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जाहिरातीत मुख्यमंत्री म्हणून चव्हाण यांनी सह्या केल्यात यावरही विरोधकांनी आक्षेप घेतला. आयोगाच्या निर्देशानंतर काँग्रेसला ही जाहिरात बदलावी लागली. पण फाईलींवर सह्या न केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी खोडून काढलाय. जर फाईलींवर सह्या केल्याच नाहीतर कामं कशी झाली ? असा प्रश्नच चव्हाणांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, मंत्रालयात फाईल मुव्हमेंट सिस्टीम आहे. कोणतीही फाईल कुठे गेली याचा सगळा रेकॉर्ड ठेवला जातो. माझ्या चार वर्षांच्या कारकिर्दीत 37 हजार फाईली क्लिअर केल्या आहेत. कुणी म्हणतं सह्या नाही केल्यात मग काम कशी झाली याचं कोडं मला सुटलेलं नाही. माझ्याकडे जे विभाग आहे त्या विभागाच्या सरासरी 700 ते 800 फाईली येत होत्या. त्याचबरोबर आपल्याकडे आरटीआय कायदा आहे. प्रत्येक कागदावर काय लिहलं काय नाही याची सगळ्यांना माहित होतं. त्यामुळे कायदा अस्तित्वात असल्यामुळे काही चुकीचे निर्णय काही संशयास्पद निर्णयाला मी जबाबदार धरला जाईल हे साहजिक आहे. त्यामुळे प्रत्येक फाईल तपासून काम करणे हे महत्वाचे होते असंही ते म्हणाले.

तसंच विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कामाचा वेग वाढला होता. प्रत्येक आमदारांची कामं होती. त्यामुळे 5 ते 10 टक्के कामाचा वेगही वाढला. सामाजिक न्याय, आरक्षणाचे प्रश्न होते याचा निर्णय घेतला गेला. यात कुठेलाही आर्थिक प्रश्न नव्हता. काही जणांची मागणी होती की रस्त्याचे कंत्राट मंजूर करावे अशी आग्रहाची भूमिका होती असं सांगत त्यांनी अजित पवारांकडे बोट दाखवलं. आता ज्यांनी आरोप केलाय ते पहिल्यांदा म्हणाले, फाईलींवर सह्या करत नाही आणि जेव्हा सरकार पडलं तेव्हा वेगाने सह्या झाल्यात हे कसं शक्य आहे असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2014 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close