S M L

मराठा संघटनांनी शिवस्मारकाचं राजकारण करू नये - शरद पवार

29 मे शिवस्मारक समितीच्या वादाच्या निमित्ताने कृषिमंत्री शरद पवारांनी राज्यातल्या मराठा नेत्यांना फटकारलं आहे. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, अशा महापुरुषाबद्दल संकुचित वृत्ती कोणीही ठेवू, असंही ते म्हणाले. सर्वांना सामावून घेणारे अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा होती, त्यामुळे त्यांना कोण्या एका जातीत बंदिस्त करण्याचं राजकारण मराठा संघटनांनी खेळू नये अशी थेट प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. मुंबईत उभारल्या जाणार्‍या शिवस्मारकाच्या समितीवर बाबासाहेब पुरंदरे यांना घ्यायला मराठा संघटनांनी विरोध केला होता. बाबासाहेबांवर त्यांनी वैयक्तिक टीकाही केली होती. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेल्या टीकेला वैतागून राज ठाकरे यांनी पत्रक काढलं होतं. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणारे पुरुषोत्तम खेडेकर, विनायक मेटे आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. 'पुरंदरे ब्राम्हण आहेत, त्यात त्यांचा काय गुन्हा?' असा सवालही राज यांनी पत्रकातून विचारला होता. एकंदरीत शिवाजी महाराजांवरून जो काही वाद निर्माण झाला आहे त्याला शरद पवार यांनी ' शिवाजी महाराजांना जाती-पातीत अडकवू नका, असं म्हणत मराठा नेत्यांना फटाकावलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2009 03:57 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2009 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close