S M L

एवढी कटुता कशाला ?, उद्धव ठाकरेंच्या टीकेनं स्वराज दुखावल्या

Sachin Salve | Updated On: Oct 8, 2014 08:46 PM IST

एवढी कटुता कशाला ?, उद्धव ठाकरेंच्या टीकेनं स्वराज दुखावल्या

swaraj on uddhav08 ऑक्टोबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शाब्दिक हल्ल्याने भाजपच्या नेत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज दुखावल्या गेल्यात. भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची ठाकरे यांनी अफझल खानांशी तुलना केल्यामुळे स्वराज यांनी नाराजी व्यक्त केली. युती तुटल्यानं राजकीय नाती तुटली पण वैयक्तिक नात्यात एवढी कटुता कशाला असा भावनिक सवाल सुषमा स्वराज यांनी केला. त्या सांगलीत बोलत होत्या.

युती तुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. आपल्या प्रत्येक सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. बीडमध्ये झालेल्या सभेत उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. एकीकडे मोदी महाराष्ट्र तोडणार नाही असं म्हणतात पण दुसरीकडे फडणवीस आणि गडकरी वेगळ्या विदर्भाची आश्वासनं देत आहे. दिल्लीतून आलेली मोदींची टीम ही अफझल खानाची फौज आहे अशी तुलनाच उद्धव यांनी केली. भाजपच्या नेत्यांनी यावर संयम बाळगला. पण आज भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी उद्धव यांच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली. नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांबद्दल आदर आहे म्हणून शिवसेनेवर टीका करणार नाही असं जाहीर केलं होतं. त्यानंतर वाटलं होतं की, शिवसेना पण संयमानं वागेल. पण आमच्या प्रचारावर 'अफझल खान' असल्याचा आरोप शिवसेनेने केला, त्यामुळे मला वाईट वाटलं, असं सुषमा स्वराज म्हणाल्या. आम्ही 'मातोश्री' चा आदर करतो पण उद्धव यांनी मर्यादा तोडू नये. युती तुटल्याने राजकीय नाती तुटली पण वैयक्तिक नात्यात एवढी कटुता कशाला असा प्रश्नही सुषमा स्वराज यांनी केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2014 06:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close