S M L

भिवंडीत सेना-भाजपच्या उमेदवारांमध्ये हाणामारी

Sachin Salve | Updated On: Oct 8, 2014 08:06 PM IST

भिवंडीत सेना-भाजपच्या उमेदवारांमध्ये हाणामारी

sena bjp08 ऑक्टोबर : मुंबईतील भिवंडी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार, विद्यमान आमदार रुपेश म्हात्रे व भाजपचे उमेदवार संतोष शेट्टी या दोघांमध्ये रात्री उशिरा कामतघर परिसरात मारामारी झाल्याची घटना घडली असून दोन्ही गटाकडून शहर पोलीस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शिवसेना व भाजप यांची 25 वर्षांपासूनची युती तुटल्याने सद्या दोघेही चांगलेच हाड वैरी झाले असताना भिवंडी पुर्व या विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या उमेदवारामध्ये रात्री उशिरा मारामारी झालीय. भाजपचे उमेदवार संतोष शेट्टी यांचे समर्थक डॉ.चेन्ना हे कामतघर गणेशनगर येथील आपल्या घरी प्रचार कार्यालयातून परतत असताना तेथे त्यांच्यावर शिवसेना उमेदवार रुपेश म्हात्रे यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी जमा झालेल्या भाजप कार्याकर्त्यांनी रुपेश म्हात्रे यांचा सख्खा भाऊ संजय म्हात्रे यांना मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून संजय म्हात्रे यास ताब्यात घेतलं. पण त्याचवेळीरुपेश म्हात्रे आणि संतोष शेट्टी हे समोरासमोर आल्याने त्यांच्यात धक्काबुक्की होवुन हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी सौम्य लाठीचार्ज करून दोन्ही उमेदवारांना ताब्यात घेऊन परिस्थिती आटोक्यात आणलीय. पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध तक्रारी दाखल करून गुन्हा दाखल केलाय. मात्र रुपेश म्हात्रे आणि राष्ट्रवादीतून आयात केलेले भाजपचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्या हाणामारीच्या घटनामुळे तेलंगु आणि गुजराती - मारवाडी समाजमध्ये चांगलीच घबराहाट पसरलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2014 08:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close