S M L

नारायण राणे तर निरुद्योगमंत्री -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Oct 8, 2014 10:26 PM IST

नारायण राणे तर निरुद्योगमंत्री -उद्धव ठाकरे

uddhav thackarey08 ऑक्टोबर : काही जण म्हणतात मी इथला नेता आहे. मी इथला विकास करणार मग इतके वर्ष काय केलं. कसले उद्योग केले निरुद्योगमंत्री ? अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते नारायण राणेंवर केली. एवढंच नाहीतर इथली पानटपरी जरी घेतली असेल तर त्यात यांची पार्टनशीप असेल चुना लावायला हे मोकळे असा टोलाही उद्धव यांनी लगावला. ते मालवणमध्ये बोलत होते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज (बुधवारी) काँग्रेसचे प्रचार समितीचे प्रमुख आणि माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे मालवणमध्ये जाहीर सभा घेतली आणि या सभेत त्यांनी नारायण राणेंविरोधात तुफान फटकेबाजी केली. भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी पुन्हा युती तोडण्यासाठी भाजपला जबाबदार धरले. युती तोडायचं मनात नव्हतं पण भाजपनं युती तोडली. त्यांनी शिवसेनेशी युती तोडली नाही तर हिंदुत्वाशी युती तोडलीय. एकीकडे पंतप्रधान महाराष्ट्र तुटू देणार नाही अशी ग्वाही देत आहे पण दुसरीकडे भाजपचे नेते विदर्भ तोडण्याची भाषा करत आहे. यासाठीच तुम्हाला शिवछत्रपतींचा आशीर्वाद पाहिजे का ? अशी टीका पुन्हा एकदा केली. दिल्लीवरून कुणाही शहेनशहा आला तरी त्याच्यापुढे झुकणार नाही अशी गर्जनाही उद्धव यांनी केली. त्यानंतर उद्धव यांनी आपला मोर्चा नारायण राणे यांच्याकडे वळवला. कोकणात उपचारासाठी धड रुग्णालय नाही. कोणतेही मोठे प्रकल्प इथं आणले नाही. आपल्या स्वार्थापोटी प्रकल्प आणण्याचा हट्टहास राणेंनी केला असा आरोप उद्धव यांनी केला. ते एवढ्यावरच थांबले नाही, काही जण म्हणतात, मी इथला नेता आहे. मी इथला विकास करणार मग इतके वर्ष काय केलं. कसले उद्योग केले निरुद्योगमंत्री ? सगळ्या जमिनी यांनी हडपल्या. साधी पानटपरी ही यांनी सोडली नाही. या पानटपरीतही यांची पार्टनशिप असेल म्हणून चुना लावायला मोकळे असेल. कटिंग चहा जरी घेतला तरी त्यामध्ये सुद्धा अर्धा कट असेल अशा शेलक्या शब्दात उद्धव यांनी राणेंवर टीका केली. तसंच आता आपला विजय टप्यात आहे. फक्त घोषणेची बाकी आहे. आताच सगळे फटाके फोडू नका 19 तारखेसाठी वाचवून ठेवा असा विश्वासही उद्धव यांनी व्यक्त केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2014 10:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close