S M L

शिवस्मारक समितीच्या वादात राज ठाकरेंनी पडू नये - विनायक मेटेंचा इशारा

29 मे शिवस्मारक समितीच्या वादाला आता वेगळं वळण मिळू लागलंय. राज ठाकरे यांना शिवाजी महाराज माहिती नाहीत म्हणून त्यांनी आता या समितीत पडू नये असा इशारा विनायक मेटे यांनी दिलाय. शिवस्मारक समितीवरून निर्माण झालेल्या वादाला ब्राम्हण-ब्राम्हणेतर वादाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करताहेत, अशी टीकाही हुसेन दलवाई यांनी केलीय. इतिहासाचं विकृतीकरण करणार्‍या आणि जातीयवादाला खतपाणी घालणार्‍या व्यक्तींना शिवस्मारक समितीवर घेऊ नये. अशा व्यक्तींच्या समितीवरील निवडीला आपला आक्षेप असेल, असं मत हुसेन दलवाई यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत उभारल्या जाणार्‍या शिवस्मारकाच्या समितीवर बाबासाहेब पुरंदरे यांना घ्यायला मराठा संघटनांनी विरोध केला होता. बाबासाहेबांवर त्यांनी वैयक्तिक टीकाही केली होती. त्या टीका करणार्‍यांच्या विरोधात राज ठाकरे यांनी पत्रक काढलं आहे. राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर उचलणार्‍या जाणार्‍या हातांचा आम्ही बंदोबस्त करू असं त्या पत्रकात म्हटलं आहे. त्या पत्रकात 'महाराष्ट्र जातींमध्ये फोडण्याचा नीच प्रयत्न काही लोक करतायत ', असंही त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 'पुरंदरे ब्राम्हण आहेत, त्यात त्यांचा काय गुन्हा?' असा सवालही त्यांनी विचारलाय. राज यांनी या पत्रकात पुरूषोत्तम खेडेकर, विनायक मेटे आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्यावरही टीका केली आहे. या टीकेला विनायक मेटे आणि हुसेन दलवाई यांनी उत्तर दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2009 03:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2009 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close