S M L

हेच का ते अच्छे दिन ? -राज ठाकरे

Sachin Salve | Updated On: Oct 8, 2014 11:17 PM IST

89raj_thackarey_mns08 ऑक्टोबर : पाकिस्तान सीमारेषेवर कुरापत्या काढत आहे. आमचे जवान सीमारेषेवर शहीद होत आहे. त्यांचं पार्थिव इकडे तिरंग्यात आणलं जाईल पण आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणात सभांवर सभा घेत आहेत. आम्ही बदल मागितला होता पण हेच का ते अच्छे दिन ? अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसंच नरेंद्र मोदींचं गुजरात प्रेम काही जात नाहीये. पंतप्रधान असून सुद्धा ते गुजरातमध्येच अडकून पडले आहेत ते देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे ? अशी टीकाही राज यांनी केली. ते ठाण्यातील सभेत बोलत होते.

आज युती आणि आघाडी जरी तुटली असेल तरी हे सर्व अगोदरच ठरलं होतं. सर्व प्लॅनिंग करून ठेवलं आणि ऐन फॉर्म भरण्याच्या दोन दिवसाअगोदर यांनी युती, आघाडी तोडली. यांनी लोकांना मूर्ख बनवलंय. शरद पवार यांना भाजपमध्ये यायचं होतं पण संघाने विरोध केल्यामुळे त्यांचा प्रवेश रखडला असा गौप्यस्फोटही राज यांनी केला. आज नरेंद्र मोदी राज्यात सभा घेत आहे पण त्यांच्या सुरक्षेसाठी गुजरातचे पोलीस बंदोबस्तासाठी असता त्यांना महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास नाही का ? असा सवालही राज यांनी विचारला. मोदी जिथे जाता तिथे गुजरातच्या विकासाचे गोडवे गातात. पण ते देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना सर्व राज्य समान असली पाहिजे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल मुंबईत येऊन येथील उद्योजकांना त्यांच्या राज्यात येण्याचे आवाहन करतात. त्यांना पंतप्रधानांनी खडसावले पाहिजे होते. पण मोदी अजूनही पंतप्रधान झाले नाही, ते गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत असा आरोपही राज यांनी केला. पाकिस्तान सीमारेषेवर कुरापत्या काढत आहे. आमचे जवान सीमारेषेवर शहीद होत आहे. त्यांचं पार्थिव इकडे तिरंग्यात आणलं जाईल पण आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणात सभांवर सभा घेत आहेत. आम्ही बदल मागितला होता पण हेच का ते अच्छे दिन ? असा सवाल त्यांनी केला.

'युती-आघाडी करणार नाही'

मी युती आघाडी करणार नाही, मला या लोकांवर अजिबात विश्वास नाही. एकीकडे युती करायची आणि जागांसाठी भांडत बसायचं. आजपर्यंत पक्ष एकट्याने चालवला आणि पुढे असाच चालवत राहिन पण युती आघाडीच्या फंद्यात पडणार नाही असंही राज यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2014 11:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close