S M L

मनमोहन सिंग यांची पहिली कॅबिनेट बैठक सुरू

30 मे नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी नंतर मनमोहन सिंग कॅबिनेटची आज पहिली बैठक होत आहे. आजच्या या बैठकीत आर्थिक .विषयांवर निर्णय घेण्याची शक्यता आहे. 4 जूनला संसदेत होणारं राष्ट्रपतींच अभिभाषण, हा या बैठकीचा मुख्य विषय आहे. मनमोहनसिंग सरकारच्या ड्रीम प्रोजेक्ट असणार्‍या योजना आणि ध्येयधोरणांचं प्रतिबिंब या भाषणामध्ये असेल. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महिला विधेयकाचाही राष्ट्रपतींच्या अभिभाषणात समावेश असण्याची शक्यता आहे.पंतप्रधानांच्या घरी सात रेसकोर्स रोडवर बैठक सुरू आहे. या पूर्वीही पंतप्रधानांची पहिल्या टप्प्यांतल्या शपथविधी एक बैठक झाली होती. त्या बैठकीस फक्त 19 मंत्री उपस्थित होते. दुस-या शपथविधीनंतरची पंतप्रधानांची ही दुसरी बैठक आहे. या बैठकीस पंतप्रधांचं संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहिलं आहे. आजच्या बैठकीत जरी महत्त्वाचे निर्णय झाले नसले तरी येत्या पाच वर्षांचा सरकारच्या कामकाजाचा अजेंडा ठरवला जाणार आहे. तसंच राष्ट्रपतींच्या अभिभाषणात कोणते महत्त्वाचे मुद्दे घ्यायचे यावरही चर्चा होणार आहे. कारण राष्ट्रपतींचं अभिभाषण हे नव्या सरकारच्या योजना आणि घोषणांवर अवलंबून असतं. आजच्या बैठकीतल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती सूत्रांकडून समजली आहे. त्यातला पहिला मुद्दा असेल तो राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना. राष्ट्रीय ग्रामीण योजना हा युपीएचा एक यशस्वी प्रोजेक्ट आहे. त्यावर अधिक भर देण्याविषयी बोललं जाणार आहे. तसंच अर्थिक संकट आल्यावर त्याचा मुकाबला करण्यासाठी जास्तीचं पॅकेज देण्याची गरज आहे का, याविषयी चर्चा होईल. तिसरा मुद्दा असेल तो महिला आरक्षणाचा. पंधराव्या लोकसभेत महिला आरक्षणाचं विध्येयक पास करून घ्यावं अशी सोनिया गांधींची इच्छा असल्याचं समजत आहे. हे सगळे मुद्दे राष्ट्रपतींच्या भाषणात येणार आहेत. 31 जुलै पूर्वी बजेट सादर करण्याची चर्चाही या बैठकीत होणार आहे. कारण 9 जूनला पहिलं सेशन संपणार आहे. त्यानंतर बजेटसाठी आणखी एक सेशन भरणार आहे. त्यासाठीचे महत्त्वाचे निर्णय जे कॅबिनेट घेणार आहे त्यावरही चर्चा होईल. युपीएने त्यांच्या जाहिरनाम्यामध्ये कित्येक आश्वासनं दिली होती. उदा. 3 रुपये किलोने गहू आणि तांदूळ देण्याचं आश्वासन... तर अशा आश्वासनांवरही चर्चा होणार आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना मग ते कॅबिनेट असो की राज्यमंत्री असादर्जाचे 100 दिवसांचं टार्गेट दिलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या 100 दिवसांच्या आत काम करून दाखवायला हवं, अशी तंबीच दिली आहे. पंतप्रधान त्यांच्या या वक्तव्याविषयी कॅबिनेटमध्ये कडक भूमिका घेतील आणि सगळ्या मंत्र्यांना त्यांची काय काय जबाबदारी आहे, याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देतील.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2009 07:42 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2009 07:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close