S M L

सत्तेसाठी भाजप-सेना पुन्हा एकत्र येतील -सोनिया गांधी

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2014 05:01 PM IST

sonia gandhi09 ऑक्टोबर : भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. निवडणुकीत वेगळेवेगळे लढणारे हे दोन पक्ष निवडणूक झाली की सत्तेच्या मोहामुळे पुन्हा एकदा परत एकत्र येतील असं भाकित काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं. विरोधक जनतेला मूर्ख बनवत आहेत. महाराष्ट्रात फक्त काँग्रेसच विकास करू शकते असा दावाही सोनियांनी केला. त्या कोल्हापूरमध्ये बोलत होत्या.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (गुरुवारी) राज्यात प्रचाराचा शुभारंभ केला. कोल्हापूरमध्ये सोनिया गांधींची भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी, शिवसेनेवर सडकून टीका केली. देशातल्या लोकांना खोटी खोटी स्वप्नं दाखवणार्‍या मोदी सरकारकडे आता देशातील जनता उत्तरं मागत आहे. गेल्या 100 दिवसांत काय काम केलंय ? देशातील अनेक सत्ता केंद्र मोदी गुजरातमध्ये घेऊन जाण्याची यांची तयारी सुरू आहे. महाराष्ट्र गुजरातपेक्षा खूप पुढे आहे. पण भाजपचे नेते इकडे येऊन गुजरातच्या विकासाच्या फक्त गप्पा मारतायत. सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. आमचे जवान शहीद होत आहे पाकिस्तानला सडेतोड उत्तर का नाही दिलं ? असा सवाल सोनियांनी विचारला. तसंच 100 दिवसांत कुठला विकास केलाय तुम्ही देशाच्या जनतेला याचा हिशेब द्या असा टोलाही त्यांनी लगावला. भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. निवडणुकीत वेगळेवेगळे लढणारे हे दोन पक्ष निवडणूक झाली की सत्तेच्या मोहामुळे पुन्हा एकदा परत एकत्र येतील असंही सोनिया म्हणाल्या. तसंच मागच्या 15 वर्षात काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि कार्यकर्त्यांमुळे महाराष्ट्रात विकास झालाय. महाराष्ट्राने गेल्या 15 वर्षात खूप प्रगती केलीय असा दावाही सोनियांनी केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2014 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close