S M L

पैसाच पैसा चोहीकडे, दिवसभरात कोट्यवधी रूपये जप्त

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2014 11:08 PM IST

black money09 ऑक्टोबर : एकीकडे प्रचार तोफा धडाडत आहे तर दुसरीकडे पैशांचा पाऊस पडतोय. आजच्या दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी केल्या कारवाईत भरारी पथकानं आतापर्यंत चार ठिकाणाहून कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आली आहे. पुणे, दहिसर, नागपूर, अमळनेरमध्ये एक कोटींहून जास्त रोकड जप्त करण्यात आली आहे. नागपूरमधून 70 लाख, दहिसरमधून 50 लाख, खेडमधून 20 लाख 48 हजार 500 तर डहाणूमध्ये साडे सोळा लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. मात्र हा पैसा कुणाचा आहे ? हा पैसा कुठून आला याचा तपास सुरू आहे.

भाजपच्या उमेदवार मनिषा चौधरींच्या गाडीत सापडली 50 लाखांची रोकड

दहिसरमधील सुधीर फडके उड्डाण पुलाजवळ भाजपच्या उमेदवार मनिषा चौधरी यांच्या गाडीत 50 लाखांची रोकड सापडली आहे. ही रोकड एमएचबी पोलिसांनी जप्त केली आहे. ही रक्कम प्रचारासाठी पक्षाकडून घेण्यात आली होती. जनकल्याण सहकारी बँकेतून ही रक्कम काढण्यात आली होती असं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलं. तर शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी मात्र ही रोकड मतदारांना वाटण्यासाठी आणली होती असा आरोप केलाय.

पुण्यात भाजप उमेदवाराच्या गाडीत 20 लाखांची रोकड जप्त

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने केलेल्या आणखीन एका कारवाईमध्ये रोकड जप्त करण्यात आलीय. पुणे जिल्ह्यात खेड टोल नाक्यावर 20 लाख 48 हजार 500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. आंबेगावचे भाजप उमेदवार जयसिंग एरंडेंच्या प्रचाराच्या गाडीत ही रक्कम सापडली. ही गाडी जयसिंग एरंडेंच्या मुलाची आहे.

अमळनेरमध्ये एक कोटी जप्त

अमळनेरमध्ये एक कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. टाटा सुमो गाडीतून ही रोकड जप्त झालीये.ही रोकड जळगाव जनता सहकारी बँकेची असल्याचा दावा करण्यात येतोय. ही रक्कम धुळ्यातून चोपड्याकडे नेली जात होती. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलंय. ही रक्कम जळगाव जनता सहकारी बँकेची आहे. त्यामुळे या प्रकरणी आता गुन्हा दाखल होणार नाहीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2014 11:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close