S M L

भाजपला शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार कुणी दिला- पवार

Samruddha Bhambure | Updated On: Oct 10, 2014 01:30 PM IST

sharad pawar 15th

10 ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करुन शिवरायांच्या आशीर्वाद मागणार्‍या भाजपने गुजरातच्या पाठ्यपुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवून महाराजांचा अपमान केला असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. त्याच बरोबर अशा लोकांना शिवछत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार कोणी दिला असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार रेखा खेडेकर यांच्या प्रचारसभेत शरद पवार बोलत होते.

गुजरातमध्ये शालेय पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती देण्यात आली. शिवाजी महाराजांची जन्मतारीख चुकली. यात भर म्हणजे दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे आजोबा असल्याचे म्हटले आहे. हा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही असेही त्यांनी खडसावले.

पाकिस्तानच्या हल्ल्याबाबतही त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. पाकिस्तान देशातील सीमेवर गोळीबार करत आहे. सीमेजवळच्या गावातील रहिवासी स्थलांतरित होत असताना आमचे पंतप्रधान सभा घेण्यात व्यस्त आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 10, 2014 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close