S M L

पी. एन. ज्वेलर्सच्या बिल्डिंगला लागलेली आग आटोक्यात

Samruddha Bhambure | Updated On: Oct 11, 2014 10:13 AM IST

पी. एन. ज्वेलर्सच्या बिल्डिंगला लागलेली आग आटोक्यात

11 ऑक्टोबर : मुंबईतील वांद्र्यातल्या लिंक रोडवरच्या पी. एन. ज्वेलर्सच्या बिल्डिंगला आज सकाळी एक भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी आग आटोक्यात आणली आहे.

वांद्र्यातल्या लिंक रोड इथे आज सकाळी साडे सात-आठच्या सुमारास पी. एन. ज्वेलर्सच्या बिल्डिंगला आग लागली. या बिल्डिंगच्या टेरेसवर एक मंडप घालण्यात आला होता, त्या मंडपाला आग लागली होती आणि

ती पसरली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू असून यात जीवितहानी झाली नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2014 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close