S M L

आबा नको ते बोलले म्हणे, निवडणूक झाल्यावर बलात्कार करायचा !

Sachin Salve | Updated On: Oct 11, 2014 08:44 PM IST

आबा नको ते बोलले म्हणे, निवडणूक झाल्यावर बलात्कार करायचा !

r r patil speech11 ऑक्टोबर : 'आमदार व्हायचं होतं तर किमान निवडणूक झाल्यावर बलात्कार करायचा' हे वक्तव्य दुसरं तिसरं कुणी केलं नाही तर हे वक्तव्य केलं आहे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांनी. आर.आर.पाटील एवढ्यावरच थांबले नाही आपण उपरोधीपणाने टीका केली होती. तरीही जर कुणी वेगळा अर्थ काढत असले तर मी खंत व्यक्त करतो अशा कोरड्या शब्दात आबांनी माफीनामा सादर केला.

'बडे बडे शहरो में छोटे छोटे हादसे होते रहते हैं' असं वक्तव्य केल्यामुळे आर.आर.पाटील यांना गृहमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. मात्र आता पुन्हा एकदा आर.आर.पाटील यांनी वादग्रस्त व्यक्तव्य करून निवडणुकीच्या रणधुमाळीत एकच खळबळ उडवून दिलीये. आपल्याच होमग्राऊंड अर्थात सांगलीमध्ये कवठेएकंद इथं झालेल्या सभेमध्ये आर.आर.पाटील यांनी भलतीच मुक्ताफळं उधळली. सांगलीत मिरजमधून मनसेकडून सुधाकर खाडे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. कवठेएकंद इथं झालेल्या सभेत आबांनी या उमेदवारावर बलात्काराचे गुन्हे दाखल आहे असं सांगितलं. यांचे समर्थक मला भेटले आणि म्हटले, आबा आमचा पाठिंबा तुम्हाला. म्हटलं का? तर म्हणे आमचा एक उमेदवार तुरुंगात आहे. मी म्हटलं, काय पुण्यकर्म केलं. त्यांनी सांगितलं, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झालाय. मिरजेत अर्ज भरला. जर त्याला इथं उभा राहयचंच होतं, आपल्या तालुक्याचं आमदार व्हायचं होतं तर किमान बलात्कार निवडणुकीनंतर तरी करायचा अशी मुक्ताफळंच आबांनी उधळली. त्यांच्या या वक्तव्याबाबत आयबीएन लोकमतनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी आबा म्हणाले, त्या उमेदवारावर 307 चा बलात्काराचा, विनयभंगाचा गुन्हा नोंद झालाय. त्यामुळे त्याच्यावर उपरोधीपणाने टीका केलीय. निदान निवडणुकीपर्यंत तरी असं वागायचं नाही. मी महिलांच्या बाबतीत आजपर्यंत अनेक धोरणं राबवली, डान्सबार बंदी असेल, महिला पोलीस भरती असले अशी अनेक काम केली. माझी कामं सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. त्यावर गुन्हा नोंद झालाय त्या दृष्टीने मी टीका केली. तरीही जर कुणी वेगळा अर्थ काढत असले तर मी खंत व्यक्त करतो असं सांगत त्यांनी माफीनामा सादर केला.

काय म्हणाले आर.आर.पाटील ?

'मनसेनं एक उमेदवार उभा केला आहे. आज मनसेचे लोक मला भेटले म्हटले आबा आमचा पाठिंबा तुम्हाला. म्हटलं का? तर म्हणे आमचा एक उमेदवार तुरुंगात आहे. मी म्हटलं काय पुण्य कर्म केलं. त्यांनी सांगितलं त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झालाय. मिरजेत अर्ज भरला. जर त्याला इथं उभा राहयचंच होतं, आपल्या तालुक्याचं आमदार व्हायचं होतं तर किमान बलात्कार निवडणुकीनंतर तरी करायचा.'

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2014 06:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close