S M L

उद्धव ठाकरे करणार शक्तीशाली महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा

Samruddha Bhambure | Updated On: Oct 12, 2014 10:21 AM IST

उद्धव ठाकरे करणार शक्तीशाली महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा

 

12 ऑक्टोबर : शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मध्ये आज रविवारी 'महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे', अशा आशयाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (रविवारी) मुंबईत वांद्रे इथल्या बी.के.सी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे 'शक्तीशाली महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करणार! असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या सभेत शिवसेना जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातल्या सर्व शाखांना याबाबत खास सूचनाही शिवसेनेनं दिल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या जाहीर सभेत नक्की कोणती महत्त्वपूर्ण घोषणा करणार याकडे माध्यमांसह सर्वांचंच लक्ष्य लागलं आहे. सर्वचजण म्हणत आहेत काय असणार 'ती' घोषणा?

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2014 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close