S M L

आजपासून रंगणार 'इंडियन सुपर लीग'चा थरार

Samruddha Bhambure | Updated On: Oct 12, 2014 11:24 AM IST

आजपासून रंगणार 'इंडियन सुपर लीग'चा थरार

12 ऑक्टोबर :  अवघ्या जगाने अलीकडेच ब्राझीलमध्ये फिफा वर्ल्डकपचा थरार 'याची देही याची डोळा' अनुभवाल्यानंतर आता भारतीय क्रीडा क्षेत्रात IMG रिलायन्स आणि स्टार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. या लीगच्या निमित्ताने क्रिकेटपटू आणि अभिनेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. भारतात पहिल्यांदाच फुटबॉलचा थरार फुटबॉलप्रेमींना अनुभवता येणार आहे.

आज इंडियन सुपर लीगचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमवर आज संध्याकाळी 6 वाजता ओपनिंग सेरिमनीनंतर यजमान ऍटलेटिको डी कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी या संघांमध्ये स्पर्धेतील सलामीचा सामना मध्ये रंगणार आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, बॉलीवूड स्टार्स जॉन अब्राहम, रणबीर कपूर, सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांच्यासारख्या युथ आयकॉन्सच्या मालकीच्या या टीम्स आहेत. येत्या 12 ऑक्टोबर ते 20 डिसेंबरपर्यंत इंडियन सुपर लीगचा पहिला सिझन पार पडणार आहे. या लीगमध्ये एकूण 8 टीम असणार आहे. दिल्ली, गोवा, गुवाहाटी, कोची, कोलकाता, मुंबई पुणे आणि चेन्नई या टीममध्ये हा सामना रंगणार आहे. 'आयसीएल'मध्ये बक्षिसांचंही खास आकर्षण आहे. बक्षिसाची एकूण रक्कम ही 15 कोटी इतकी आहे. प्रत्येक फ्रँचाईझीची किंमत ही 120-180 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे प्रत्येक टीममध्ये 14 भारतीय प्लेअर्स असणार आहे त्याच्याबरोबर 7 परदेशी प्लेअर्सही असणार आहे.

अशा आहेत इंडियन सुपर लीगच्या टीम्स

 • ऍटलेटिको कोलकाता
 • चेन्नई टायटन्स
 • दिल्ली डायनामोज
 • गोवा फुटबॉल क्लब
 • केरला ब्लास्टर्स
 • मुंबई सिटी फुटबॉल क्लब
 • नॉर्थ ईस्ट युनायटेड
 • पुणे सिटी फुटबॉल क्लब

आयसीएलचे टीम मालक

 • ऍटलेटिको कोलकाता : सौरव गांगुली, ऍटलेटिको मादि्रद
 • चेन्नई टायटन्स : अभिषेक बच्चन, इंटर मिलान
 • दिल्ली डायनामोज : डेन नेटवर्क
 • गोवा फुटबॉल क्लब (FC): वेणूगोपाल धूत, साळगांवकर, डेम्पो
 • केरला ब्लास्टर्स : सचिन तेंडुलकर, पीव्हीपी व्हेंचर्स
 • मुंबई सिटी एफसी : रणबीर कपूर, बिमल पारेख
 • नॉर्थ ईस्ट युनायटेड : जॉन अब्राहम, शिलाँग लजाँग
 • पुणे सिटी एफसी : सलमान खान, वाधवान ग्रुप

बक्षिसांची लयलूट

 • बक्षिसाची रक्कम : 15 कोटी रुपये
 • प्रत्येक फ्रँचाईझीची किंमत : 120-180 कोटी रुपये
 • मार्क प्लेअर्सची किंमत : 750,000 डॉलर्स
 • मार्क मॅनेजरची किंमत : 250,000 डॉलर्स
 • मार्क प्लेअर्स : 8
 • परदेशी खेळाडू : 56
 • भारतीय खेळाडू : 112
 • प्रत्येक टीम खेळणार्‌या मॅचची संख्या : 14
 • 2 सेमीफायनल : होम आणि अवे फॉरमॅट

असं आहे आयसीएलचे स्वरुप

 • प्रत्येक टीममध्ये 7 परदेशी प्लेअर्स
 • प्रत्येक टीममध्ये 14 भारतीय प्लेअर्स
 • प्रत्येक टीमला एक मार्क (आयकॉन) प्लेअर्स
 • अंतिम 11 मध्ये 6 परदेशी खेळाडू
 • अंतिम 11 मध्ये 5 भारतीय खेळाडू
 • 12 ऑक्टोबर 2014 : ओपनिंग मॅच
 • कोलकाता वि. मुंबई : पहिली मॅच : सॉल्ट लेक स्टेडियम
 • 20 डिसेंबर 2014 : फायनल

आयसीएलमधील परदेशी क्लब

 • ऍटलेटिको मादि्रद, स्पेन : कोलकाता
 • फिओरेंटिना, इटली : पुणे
 • फायेनूर्ड, हॉलंड : दिल्ली
 • इंटर मिलान, इटली : चेन्नई

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2014 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close